CoronaVirus: कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करिश्मा कपूरने दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 13:11 IST2020-04-03T13:10:06+5:302020-04-03T13:11:17+5:30
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करिश्मा कपूर पुढे सरसावली आहे.

CoronaVirus: कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करिश्मा कपूरने दिला मदतीचा हात
कोरोना व्हायरसचा भारतात प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संपूर्ण जगात या व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत कित्येक लोकांचा बळी गेला आहे. या व्हायरसमुळे भारतात 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला गेला आहे हा लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या परिस्थितीत पीएम केअर फंडमध्ये मदत निधी देऊन लोक मदतीचा हात देत आहेत. या फंडात कित्येक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही आपले योगदान दिले आहे. त्यात आता बॉलिवूडची लोलो म्हणजेच अभिनेत्री करिश्मा कपूरदेखील पुढे सरसावली आहे.
अभिनेत्री करिश्मा कपूरने तिची मुलगी समायरा व मुलगा किआनसोबत पीएम केअर फंड आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये पैसे डोनेट केले आहेत. ही माहिती खुद्द तिनेच इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून दिली आहे. तिने किती निधी दिला आहे, हे समजू शकलेले नाही.
करिश्मा कपूरने पोस्ट शेअर करत लिहिले की, आम्ही डोनेट केले, कृपया तुम्ही देखील डोनेट करा. एक छोटेसे योगदान कित्येक जीवन बदलू शकतात.
नुकतेच करीना कपूरने नवरा सैफ अली खानसोबत कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला होता.
करीनाने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले की, आम्ही पीएम केअर्स फंड व मुख्यमंत्री मदत निधीमध्ये योगदान दिले आहे. अशावेळी मदतीसाठी घेतलेला पुढाकार व दिलेला एकेक पैसा खूप महत्त्वाचा आहे. जिथे शक्य होईल तिथे मदत करा. करीना सैफ आणि तैमूर.
अशाप्रकारे करीनाने आपल्या चाहत्यांनाही मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.