Corona Effect: दीपिका इतकी झाली आळशी, दिवसरात्र नाईटसूटमध्येच फिरत असते ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 13:00 IST2020-03-28T12:57:00+5:302020-03-28T13:00:55+5:30
दीपिका पदुकोणने या आठवड्यात ती कुठे जाणार आहे यासंबंधीचा तिचा शनिवार आणि रविवारचा ट्रॅव्हल प्लॅन शेअर केला आहे.

Corona Effect: दीपिका इतकी झाली आळशी, दिवसरात्र नाईटसूटमध्येच फिरत असते ही अभिनेत्री
एरव्ही प्रत्येकवेळी सुपस्टायलिश कसे राहाता येईल याकडेच बॉलिवूडच्या अभिनेत्री सर्वाधिक लक्ष देतात. मात्र आज कोरोनामुळे सगळेच घरात बंदिस्त झाले आहे. वेल घालवण्यासाठी फक्त घारतलीच काम करत सध्या या अभिनेत्रींना वेळ घालवावा लागतो. आहे अशात बॉलिवूडच्या काही अभिनेत्री त्या या काळात काय -काय करत आहेत,या सगळ्या गोष्टी अपडेट करत आहेत. असाच प्रकार सध्या बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण देखील करत आहेत. सध्या ती रणवीर सिंहसह एकाच खोलित बंद आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा क्वॉरंटाईन टाईम मजेशीर ठरत आहे. दीपिका हा क्वॉरंटाईन इतका इन्जॉय करत आहे की तिला आता कसलीच चिंता नाही.
नेहमीच टापटीप दिसणारी दीपिका आता फक्त नाईटीमध्ये दिवस रात्र घरात फिरत असते. इतकेच नाहीतर ती तिचे फोटो देखील शेअर करते तेव्हा ती फक्त नाईटीमध्येच दिसते. खुद्द बॉलिवूड अभिनेता वरूण धवनेच हे सा-यांच्या लक्षात आणून दिले आहे. दीपिकाच्या एका फोटोवर वरूणने दीपिकाला तू फक्त नाईट ड्रेसमध्येच का दिसते असा प्रश्न त्याने दीपिकाला विचारला होता. त्यामुळे दीपिका ख-या आयुष्यात देखील अगदी मनमौजी असल्याचे पाहायला मिळते.
दीपिका पदुकोणने या आठवड्यात ती कुठे जाणार आहे यासंबंधीचा तिचा शनिवार आणि रविवारचा ट्रॅव्हल प्लॅन शेअर केला आहे. दीपिकाने घराचा नकाशा शेअर केला आहे, ज्यात तिने लिहिले - मी घरचा नकाशा पहात आहे, या वीकेण्डच्या प्रवासाच्या कल्पनांसाठी. ट्रॅव्हल होम. लॉकडाऊनच्या काळात दीपिका सध्या घरी आहे आणि याद्वारे ती तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना घरी सुरक्षित राहण्याचा संदेश देत आहे.