'….तर मी पाकिस्तानात जाईन'; राखी सावंतचा नवीन ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 13:56 IST2023-10-08T13:47:23+5:302023-10-08T13:56:34+5:30

राखी सावंतने पाकिस्तानात जाण्याची धमकी दिली आहे. 

controversy queen Rakhi Sawant latest video viral | '….तर मी पाकिस्तानात जाईन'; राखी सावंतचा नवीन ड्रामा

Rakhi Sawant

ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कॅमेऱ्यासमोर नौटंकी करुन राखी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. राखीने मीडियासमोर आता पुन्हा एकदा असं काही म्हटलं आहे, ज्यामुळे युजर्स तिला ट्रोल करत आहेत. राखीने पाकिस्तानात जाण्याची धमकी दिली आहे. 

राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये राखी म्हणते की, 'या माझी नवीन कार बघा. जर तुम्ही जास्त नाटक केलं, तर मी पाकिस्तानात निघून जाईन.  जशी सानिया मिर्झा गेली, तशी मीही जाईल. संपुर्ण जगात माझे चाहते आहेत. मी लोखंडवालाची राणी आहे. मला तर कोणीही भेटवस्तू देतं'.

राखीच्या पाकिस्तान जाण्याच्या वक्तव्यावर युजर्सनी तिची खिल्ली उडवली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  एका युजरने म्हटले की, ' कृपा करुन जा तु पाकिस्तानात'. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, 'जा लवकर जा पाकिस्तानात, तिथे सगळे तुझी वाट पाहत आहेत', असे म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 

राखी सावंत ही केल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्यानंतर राखीने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नाव बदलून फातिमा ठेवले होते. मात्र, लग्नाच्या काही दिवसानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले.  राखीने पती आदिलवर फसवणूक आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले. काही महिने आदिल तुरुंगातही होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा राखी आणि आदिलमध्ये वाद सुरू झाला. आदिलने पत्रकार परिषदेत राखीविषयी काही धक्कादायक खुलासे केले होते. राखीने तिचा पहिला पती रितेशला अद्याप घटस्फोट दिला नसल्याचंही त्याने सांगितलं.

Web Title: controversy queen Rakhi Sawant latest video viral