CONGRATULATIONS!! ​रिया सेन करतेय लग्न ! पण कुणासोबत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 16:04 IST2017-08-16T10:32:09+5:302017-08-16T16:04:33+5:30

बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी रंगणार आहे. होय, ही अभिनेत्री आहे, बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल रिया सेन. सुचित्रा सेन यांची नात आणि मुनमुन सेन यांची मुलगी रिया लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे.

CONGRATULATIONS !! Riya Sen married! But with whom? | CONGRATULATIONS!! ​रिया सेन करतेय लग्न ! पण कुणासोबत?

CONGRATULATIONS!! ​रिया सेन करतेय लग्न ! पण कुणासोबत?

लिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी रंगणार आहे. होय, ही अभिनेत्री आहे, बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल रिया सेन. सुचित्रा सेन यांची नात आणि मुनमुन सेन यांची मुलगी रिया लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे. या महिन्यात रिया तिचा बॉयफ्रेन्ड शिवम तिवारीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. रिया सध्या ३६ वर्षांची आहे. शिवम हा तिचा जुना मित्र. गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. रिया कायम त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोतील दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखीच आहे.





अलीकडे रियाची आई मुनमुन सेन हिने एका मुलाखतीत, लेकीच्या पतीबद्दलच्या कल्पना सांगितल्या होत्या. रियासाठी सुंदर दिसणे अधिक महत्त्वाचे आहे. पैसा तिच्यासाठी महत्त्वाचा नाही. हाय मेंटेनन्सला घेऊन ती गंमत करते. ती आपल्यासाठी एक श्रीमंत पती शोधून घेईल, असे मुनमुन म्हणाली होती.
 


१९९१ मध्ये ‘विषकन्या’ या चित्रपटात रिया सेन बालकलाकार म्हणून दिसली होती. २००१ मध्ये आलेल्या ‘स्टाईल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. हा चित्रपट एक सेक्स कॉमिडी चित्रपट होता. अर्थात रियाचे बॉलिवूड करिअर फार यशस्वी नव्हतेच. काही बंगाली व मल्याळम सिनेमही तिने केले. फाल्गुनी पाठकच्या आवाजातील ‘याद पिया की आने लगी’ या गाण्याने रियाला खरी ओळख दिली. त्यावेळी रिया केवळ १६ वर्षांची होती. २००५ मध्ये रियाचा एक एमएमएस आला होता. यात ती अभिनेता अश्मित पटेलसोबत दिसली होती. सध्या रिया ही एकता कपूरच्या ‘एमएमएस202’ या वेबसीरिजमध्ये बिझी आहे. यात रिया प्रचंड बोल्ड आणि सेक्सी अंदाजात दिसणार आहे. या बेवसीरिजद्वारे रियाला पुन्हा तिची ओळख परत मिळो, इतकी कामना करूया.

Web Title: CONGRATULATIONS !! Riya Sen married! But with whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.