'रामायण'च्या रणबीर कपूरची प्रभासच्या 'आदिपुरुष'सोबत तुलना; अरुण गोविल म्हणतात- "तेव्हा जे काही घडले ते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:41 IST2026-02-02T12:40:44+5:302026-02-02T12:41:26+5:30

'रामायण' या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असून, त्याची तुलना प्रभासच्या 'आदिपुरुष'शी करणाऱ्यांना गोविल यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Comparison of Ranbir Kapoor of Ramayana with Prabhas Adipurush Arun Govil statment | 'रामायण'च्या रणबीर कपूरची प्रभासच्या 'आदिपुरुष'सोबत तुलना; अरुण गोविल म्हणतात- "तेव्हा जे काही घडले ते..."

'रामायण'च्या रणबीर कपूरची प्रभासच्या 'आदिपुरुष'सोबत तुलना; अरुण गोविल म्हणतात- "तेव्हा जे काही घडले ते..."

रामानंद सागर यांच्या ऐतिहासिक 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीरामाची अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल यांनी नितेश तिवारींच्या आगामी 'रामायण' चित्रपटावर भाष्य करत मोठी चर्चा घडवून आणली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असून, त्याची तुलना प्रभासच्या 'आदिपुरुष'शी करणाऱ्यांना गोविल यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

अरुण गोविल यांच्या मते, प्रत्येक चित्रपट आणि त्याची मांडणी वेगळी असते. 'आदिपुरुष'मध्ये जे काही घडले ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नव्हते.  कारण कथेत आणि संवादांमध्ये छेडछाड करण्यात आली होती. परंतु नितेश तिवारी यांचा हा प्रकल्प अत्यंत गांभीर्याने आणि श्रद्धेने साकारला जात असल्याने त्याची तुलना 'आदिपुरुष'शी करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

रणबीर कपूरच्या निवडीबद्दल बोलताना अरुण गोविल यांनी त्याचे भरभरून कौतुक केले. रणबीर हा एक अत्यंत प्रतिभावान आणि मेहनती कलाकार असून त्याच्यात भारतीय संस्कृतीची खोलवर जाण आहे, असे त्यांनी नमूद केले. श्रीरामाची भूमिका साकारण्यासाठी जे संस्कार आणि नैतिकता लागते, ती रणबीरमध्ये असून तो या पात्रासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करत असल्याचे गोविल यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या महाकाव्याला पडद्यावर जिवंत करण्यासाठी रणबीरने आपल्या जीवनशैलीतही मोठे बदल केल्याची चर्चा असून, गोविल यांनी त्याच्या या समर्पणाचे स्वागत केले आहे.

एक अभिनेता म्हणून अरुण गोविल यांचा या चित्रपटाशी विशेष संबंध आहे, कारण ते स्वतः या चित्रपटात 'राजा दशरथ' यांची महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. त्यांनी सांगितले की, जेव्हा एखादा कलाकार प्रभू श्रीरामासारख्या देवाची भूमिका साहित्यातून पडद्यावर आणतो, तेव्हा त्याचे रूप आणि व्यक्तिमत्व लोकांसाठी प्रेरणादायी असणे आवश्यक असते. नितेश तिवारी एक प्रगल्भ दिग्दर्शक असून त्यांनी कथेच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे महाकाव्य प्रेक्षकांसमोर आणण्याचे नियोजन केले आहे.

या भव्य चित्रपटात रणबीर कपूरसोबत साई पल्लवी 'सीता', यश 'रावण' आणि सनी देओल 'हनुमान' यांच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अरुण गोविल यांच्या या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. 'आदिपुरुष'मुळे दुखावलेल्या प्रेक्षकांच्या भावना या चित्रपटाद्वारे पुन्हा सावरल्या जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. हा चित्रपट यावर्षी अर्थात दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होणार आहे.

Web Title : अरुण गोविल ने रणबीर की 'रामायण' की 'आदिपुरुष' से तुलना की, विचार साझा किए

Web Summary : अरुण गोविल ने रणबीर कपूर की 'रामायण' के प्रति समर्पण की प्रशंसा की, 'आदिपुरुष' की कमियों के विपरीत। उन्होंने नई फिल्म की श्रद्धा और कपूर की भगवान राम को प्रामाणिक रूप से चित्रित करने की प्रतिबद्धता पर जोर दिया। गोविल स्वयं राजा दशरथ की भूमिका निभा रहे हैं, जो एक सम्मानजनक, आधुनिक पुनर्कथन की उम्मीद कर रहे हैं।

Web Title : Arun Govil Compares Ranbir's 'Ramayana' to 'Adipurush', Shares His Views

Web Summary : Arun Govil praises Ranbir Kapoor's dedication to 'Ramayana,' contrasting it with 'Adipurush' flaws. He emphasizes the new film's reverence and Kapoor's commitment to portraying Lord Rama authentically. Govil himself plays King Dasharatha, anticipating a respectful, modern retelling.