Koffee With Karan 6: प्रियांकाचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरने निक जोनासला दिला 'हा' सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 10:47 IST2019-01-07T10:31:02+5:302019-01-07T10:47:56+5:30
कॉफी विथ करणमध्ये नुकतीच हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलने हजेरी लावत रसिकांची मनं जिंकली आहेत. पुढच्या भागात आपल्याला शाहिद कपूर आणि त्याचा भाऊ ईशान खट्टरची जोडी दिसणार आहे.

Koffee With Karan 6: प्रियांकाचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरने निक जोनासला दिला 'हा' सल्ला!
कॉफी विथ करणमध्ये नुकतीच हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलने हजेरी लावत रसिकांची मनं जिंकली आहेत. पुढच्या भागात आपल्याला शाहिद कपूर आणि त्याचा भाऊ ईशान खट्टरची जोडी दिसणार आहे. ईशान खट्टर पहिल्यांदाच कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावणार आहे.
Potato. Pot-AH-to. What's in a (caller) name?#KoffeeWithKaran#KoffeeWithShahid#KoffeeWithIshaanpic.twitter.com/Il3hE2To5l
— Star World (@StarWorldIndia) January 6, 2019
टीझर व्हिडीओमध्ये शाहिद ईशाला जान्हवी कपूरच नाव घेऊन चिडवताना दिसतोय. शाहिद-ईशानच्या जोडीचा एपिसोड पाहणं खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार असणार आहे. ऐवढेच नाही तर या भागामध्ये शाहिद प्रियांका चोप्राचा पती निक जोनासाला सल्ला देताना दिसणार आहे.
Brothers. Actors. Heartthrobs. Hold on to your hearts as @shahidkapoor and #IshaanKhattar come over for some Koffee, next week. #KoffeeWithKaran#KoffeeWithShahid#KoffeeWithIshaanpic.twitter.com/HRZPyWg7vK
— Star World (@StarWorldIndia) January 6, 2019
करण जोहरने शाहिद कपूरला विचारले की तू, प्रियांका आणि निक जोनस या नवविवाहित जोड्याला काय सल्ला देशील ? यावर शाहिद म्हणाला मी निकला सांगू इच्छितो की, या नात्यामधून त्यांने कधी माघार घेऊ नये कारण तो जिच्यासोबत आहे ती पूर्णपणे देसी गर्ल आहे. हे सांगत असतानाच शाहिद कपूरने कॅमेराकडे बघून डोळा मारला. शाहिद आणि प्रियांका ऐकेकाळी डेट करत होतेय. त्यांचे डेटिंगचे व्हिडीओ खूप व्हायरलदेखील व्हायचे.
शाहिदच्या कामाबाबत बोलायचे झाले तर त्याच्या 2018मध्ये आलेले बत्ती गुल मीटर चालू सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला. यावर्षी शाहिद कपूर 'कबीर सिंग'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात शाहिदच्या अपोझिट किआरा अडवाणी दिसणार आहे. हा सिनेमा २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.