99 रुपयांत पाहा कोणताही मुव्ही! PVR INOX ची मोठी ऑफर; वाचा नेमकी कशामुळे मिळतीये ही सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 13:17 IST2024-02-21T13:15:44+5:302024-02-21T13:17:40+5:30

PVR INOX मध्ये ९९ रुपयांत सिनेमा बघण्याची खास ऑफर प्रेक्षकांना मिळतेय. क्लिक करुन वाचा सविस्तर

Cinema Lover's Day is being celebrated on 23 feb 2024 in PVR, INOX | 99 रुपयांत पाहा कोणताही मुव्ही! PVR INOX ची मोठी ऑफर; वाचा नेमकी कशामुळे मिळतीये ही सूट

99 रुपयांत पाहा कोणताही मुव्ही! PVR INOX ची मोठी ऑफर; वाचा नेमकी कशामुळे मिळतीये ही सूट

सिनेप्रेमी रसिकांसाठी स्वस्तात सिनेमा बघण्याची मोठी संधी चालून आलीय. अनेकदा PVR, INOX सारख्या मोठ्या आलिशान थिएटर्समध्ये सिनेमे पाहणं ही सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी कठीण गोष्ट असते. कारण अशा बड्या थिएटरमध्ये सिनेमांची तिकिटं महाग असतात. अशातच रसिकांसाठी PVR, INOX मध्ये स्वस्तात सिनेमा बघण्याची संधी आहे. फक्त ९९ रुपयांमध्ये तुम्ही  PVR, INOX सारख्या बड्या थिएटरमध्ये सिनेमा बघू शकता. या ऑफरविषयी सविस्तर जाणून घ्या. 

या आठवड्यात 'आर्टिकल 370', 'क्रॅक', 'ऑल इंडिया रँक' हे तीन सिनेमे रिलीज होत आहेत. याशिवाय काही दिवसांपुर्वी रिलीज झालेले 'तेरी बातोंं में ऐसा उलझा जिया' आणि 'फायटर' हे सिनेमे फक्त ९९ रुपयांमध्ये PVR, INOX मध्ये पाहता येईल. शुक्रवार २३ फेब्रुवारीला 'सिनेमा लव्हर्स डे' निमित्त हे सिनेमे ९९ रुपयांमध्ये PVR, INOX मध्ये पाहता येणार आहेत. 

PVR, INOX मध्ये एरवी तिकिटांचे दर २०० रुपयांच्या वर असतात. हेच तिकिटांचे दर 'सिनेमा लव्हर्स डे' निमित्ताने फक्त ९९ रुपयांपर्यंत आले आहेत. याशिवाय १९९ रुपयांमध्ये रिक्लायनर मध्ये बसून सिनेमा बघता येईल. फक्त २३ फेब्रुवारीपर्यंत ही ऑफर मर्यादित असून भारतातील PVR, INOX सारख्या सिनेमागृहांमध्ये ही ऑफर लागू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना स्वस्तात मस्त सिनेमा बघण्याची पर्वणी मिळेल यात शंका नाही.

Web Title: Cinema Lover's Day is being celebrated on 23 feb 2024 in PVR, INOX