शाहरूख खानला फॉलो करतोय चंकी पांडेचा पुतण्या, पाहा शाहरूखच्या एका गाण्यावरील डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 21:38 IST2018-01-25T16:07:50+5:302018-01-25T21:38:02+5:30

चकी पांडेचा पुतण्या अहान पांडे सध्या चांगलाच चर्चेत आहे. अहानचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये तो शाहरूख खानच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Chunky Pandey's nephew is following Shah Rukh Khan, see Shah Rukh's dance songs! | शाहरूख खानला फॉलो करतोय चंकी पांडेचा पुतण्या, पाहा शाहरूखच्या एका गाण्यावरील डान्स!

शाहरूख खानला फॉलो करतोय चंकी पांडेचा पुतण्या, पाहा शाहरूखच्या एका गाण्यावरील डान्स!

िनेता चंकी पांडेचा पुतण्या आणि अनाया पांडेचा कजिन अहान पांडे भलेही बॉलिवूडमध्ये येण्याची प्लॅनिंग करीत नसला तरी, त्याचा अंदाज एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. त्याची स्माइल, गुड लूक्स, पर्सनॅलिटी हे सर्व काही एखाद्या बड्या स्टारप्रमाणे त्याच्यात आहे. सध्या त्याच्यातील याच गुणांमुळे चर्चेत आला आहे. त्याचे झाले असे की, त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये तो बॉलिवूडचा किंग शाहरूख खानच्या सुपरहिट ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील ‘कोई मिल गया’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अहानचे डान्स स्किल बघता तो किंग खानला तर फॉलो करीत नाही ना? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. 

शाहरूखच्या या गाण्यावर अहान चांगलाच एन्जॉय करताना बघावयास मिळत आहे. पूर्ण एनर्जीसह तो डान्स करीत आहे. अहानचा डान्स बघून असे दिसत आहे की, त्याची मैत्रीण सुहानाच्या डॅडचा प्रचंड मोठा चाहता आहे. या व्हिडीओमध्ये अहानसोबत त्याची बहीणही डान्स करताना दिसत आहे. चंकी पांडेचे पुतणे अहान आणि अलाना यांनी काही दिवसांपूर्वीच एक फोटोशूट केले होते. ज्यामध्ये दोघांचा अंदाज खूपच जबरदस्त होता. या फोटोशूटमध्ये अहान-अलाना व्यतिरिक्त सुनील शेट्टीच्या मुलाची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफ आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप बघावयास मिळत होते. 
 

हे फोटोशूट त्यांनी एका फॅशन मॅगझिनसाठी केले होते. ज्यामध्ये सर्व स्टार किड्स खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होते. सर्व स्टारकिड्स एक फोटो मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकला. तर अहान-अलाना फोटोमध्ये अतिशय डिफरेंड लूकमध्ये बघावयास मिळाले. यातील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केले. 

Web Title: Chunky Pandey's nephew is following Shah Rukh Khan, see Shah Rukh's dance songs!