"मुलींनी कोणते कपडे घालावेत हे.."; कपड्यांवरुन अनन्याला ट्रोल करण्यांना चंकी पांडेने दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:18 IST2022-03-22T19:18:23+5:302022-03-22T19:18:57+5:30
Chunky pandey :काही दिवसांपूर्वीच अनन्या करण जोहरच्या एका पार्टीत गेली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मात्र, तिचा हा ड्रेस पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं.

"मुलींनी कोणते कपडे घालावेत हे.."; कपड्यांवरुन अनन्याला ट्रोल करण्यांना चंकी पांडेने दिलं उत्तर
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनन्या पांडेने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. मात्र, अल्पावधीत लोकप्रिय झालेली अनन्या अनेकदा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत येत असते. यात अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. 'गहराइयाँ' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अनन्याने परिधान केलेल्या कपड्यांवरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. इतकंच नाही. तर, अजूनही तिचं ट्रोलिंग सुरुच आहे. या ट्रोलिंगवर आता तिचे वडील अभिनेता चंकी पांडे यांनी त्यांचं मत मांडलं आहे.
अलिकडेच चंकी पांडेने 'हिंदुस्तान टाइम्स'ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने मुलींच्या फॅशनसेन्स आणि ट्रोलिंगविषयी त्याचं मत मांडलं आहे. "आम्ही आमच्या मुलींना कधीच कोणते कपडे घालण्यावरुन रोखलं नाही.त्यांनी काय परिधान करावं, काय करु नये याविषयी कधीच सल्ले दिले नाहीत. आम्ही फक्त आमच्या मुलींचा छान सांभाळ केला. आमच्या मुली समजुतदार आणि चांगल्या आहेत.अनन्या या क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यासाठी तिला ग्लॅमरस राहणंदेखील गरजेचं आहे. त्यामुळे स्वत:ला महत्त्व देणं आणि तिला वाटेल त्या पद्धतीने कपडे परिधान करणं हा तिचा निर्णय आहे", असं चंकी पांडे म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "माझ्या मुली किती निरागस आहेत हे मला चांगलंच माहितीये. त्यामुळे त्या काहीही परिधान करु शकतात आणि तेही अश्लील वाटणार नाही अशाच पद्धतीचे असेल याची खात्री आहे. लोक चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारे बोलतात. पण, त्यामुळे तुझी चर्चा होतीये ना हे लक्षात घे असं मी कायम अनन्याला सांगतो. त्यामुळे ट्रोलर्सकडे कसं दुर्लक्ष करायचं हे तिला समजलं आहे."
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनन्या करण जोहरच्या एका पार्टीत गेली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मात्र, तिचा हा ड्रेस पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं.