प्रसिद्ध कोरिओग्राफने शेअर केला बेडरुम व्हिडीओ; पत्नीसोबत दिसला रोमॅण्टिक मूडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 16:23 IST2021-11-30T16:22:37+5:302021-11-30T16:23:42+5:30

Punit pathak:अलिकडेच पुनीतचा त्याच्या पत्नीसोबतचा बेडरुममधील एक व्हिडीओ चर्चेत आला होता. विशेष म्हणजे पुनीतने पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

choreographer punit pathak get romantic with wife bedroom video goes viral | प्रसिद्ध कोरिओग्राफने शेअर केला बेडरुम व्हिडीओ; पत्नीसोबत दिसला रोमॅण्टिक मूडमध्ये

प्रसिद्ध कोरिओग्राफने शेअर केला बेडरुम व्हिडीओ; पत्नीसोबत दिसला रोमॅण्टिक मूडमध्ये

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी, किस्सेही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यातलंच एक नाव म्हणजे पुनीत पाठक. पुनीत अनेकदा त्याच्या पत्नी, कुटुंबासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. अलिकडेच पुनीतचा त्याच्या पत्नीसोबतचा बेडरुममधील एक व्हिडीओ चर्चेत आला होता. विशेष म्हणजे पुनीतने पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.


सोशल मीडियावर दररोज असंख्य ट्रेंड व्हायरल होत असतात. हे ट्रेंड सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण फॉलो करतात. असाच एक ट्रेंड पुनीतने फॉलो केला आहे. सोबतच त्याने पत्नीसोबतचा व्हिडीओ काढून तो इन्स्टाग्रामवर शेअरदेखील केला आहे.  

पुनीतने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो नवा ट्रेंड फॉलो करत आहे. यामध्ये त्याच्या बाजूला पत्नी निधी मुनी सिंग झोपली असून तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. विशेष म्हणजे निधीने झोपायचं नाटक केल्यामुळे पुनीतचा ट्रेंड फ्लॉप होतो. त्यामुळे शेवटी त्यालाच हसू येतं. हा मजेशीर व्हिडीओ पुनीतने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दरम्यान, 'ती खरंच झोपली आहे की जागी आहे',  असं कॅप्शन पुनीतने या व्हिडीओला दिलं आहे. विशेष म्हणजे पुनीत सोशल मीडियावर सक्रीय असून त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. पुनीतने 2020 मध्ये निधी मुनी सिंहशी लग्न केले. 'झलक दिखला जा'च्या सेटवर पहिल्यांदा या दोघांची भेट झाली. त्यानंतर प्रथम त्यांच्या मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
 

Web Title: choreographer punit pathak get romantic with wife bedroom video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.