वयाच्या ५१ व्या वर्षी कोरिओग्राफर गीता कपूरचा बॉलिवूडमधून संन्यास, म्हणाली- "आता काम कमी मिळतं, त्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:46 IST2025-06-23T16:38:19+5:302025-06-23T16:46:24+5:30

गीता कपूरने बॉलिवूड सोडलं आहे. कोरिओग्राफर असलेल्या गीताच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. काय आहे यामागील कारण

Choreographer Geeta Kapoor left Bollywood at the age of 51 kuch kuch hota hai | वयाच्या ५१ व्या वर्षी कोरिओग्राफर गीता कपूरचा बॉलिवूडमधून संन्यास, म्हणाली- "आता काम कमी मिळतं, त्यात..."

वयाच्या ५१ व्या वर्षी कोरिओग्राफर गीता कपूरचा बॉलिवूडमधून संन्यास, म्हणाली- "आता काम कमी मिळतं, त्यात..."

 

'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'दिल तो पागल है' यांसारख्या सुप्रसिद्ध सिनेमांची कोरिओग्राफर गीता कपूरनेबॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. गीता कपूरने अनेक वर्ष 'डान्स इंडिया डान्स', 'सुपर डान्स ४' अशा लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची जबाबदारीही सांभाळली आहे. गीता कपूरने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

गीता कपूरने बॉलिवूडला ठोकला रामराम

हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत नृत्यदिग्दर्शिका गीता कपूरने याविषयी खुलासा केला आहे. गीता कपूरला बॉलिवूड कमबॅकविषयी विचारला असता ती म्हणाली की, "नाही. मला वाटतं की, प्रत्येक व्यक्तीला एक पाऊल मागे घेऊन नवीन टॅलेंटला पुढे जाण्यासाठी संधी दिली पाहिजे. सध्या दुसऱ्या व्यक्तींना पुढे येण्यासाठी ही चांगली वेळ आहे. या इंडस्ट्रीने मला खूप दिलंय. पैसा, प्रसिद्धी खूप मिळाली आहे. पण जेव्हा पुढे अशी एखादी संधी येईल, आणि ती संधी जर मला सोडायची नसेल तेव्हा मी पुढे नक्की काम करेन."


गीता कपूर पुढे म्हणाली की, "सध्या इंडस्ट्रीमध्ये कामाची कमतरता आहे आणि अशा परिस्थितीत इतर लोकांना संधी दिली पाहिजे. आजकाल जे सिनेमे बनतात ते पूर्वीसारखे बनत नाहीत. आधीच्या सिनेमांमध्ये ८-१० गाणी असायची. ही गाणी लांबीनेही मोठी असायची. या गाण्यांवर कलाकार नाचायचे. पण आता काम कमी झालंय. इतक्या कमी कामातही आपण संघर्ष करतो आणि इतरांना संधी देत ​​नाही... मग त्यांना ते करू द्या.

"मी जिथे आहे तिथे मी आनंदी आहे. मला कोणत्याही बंधनात काम करायचे नाही. कॉपी-पेस्ट काम न करता क्रिएटिव्ह काम करायचे आहे." गीता कपूरच्या कारकिर्दीबद्दल बोलताना, तिने वयाच्या १७ व्या वर्षी सुरुवात केली. त्यानंतर ती फराह खानच्या ग्रुपमध्ये सामील झाली. त्यानंतर विविध सिनेमांतील असंख्य गाण्यांसाठी गीताने कोरिओग्राफी केली.

Web Title: Choreographer Geeta Kapoor left Bollywood at the age of 51 kuch kuch hota hai