Ranveer Singh : रणवीर हे तुझ्यासाठी... म्हणत कोरिओग्राफर आदिल खाननेही दिल्या न्यूड पोझ, झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 13:18 IST2022-07-30T13:16:01+5:302022-07-30T13:18:42+5:30

Choreographer Aadil Khan poses nude : रणवीरला सपोर्ट करणाऱ्यांमध्ये आता कोरिओग्राफर आदिल खानचं नावही सामील झालं आहे. आदिल खानने रणवीरला कसा सपोर्ट केला तर, स्वत: न्यूड पोझ देत.

choreographer aadil khan poses nude in support of Ranveer Singh | Ranveer Singh : रणवीर हे तुझ्यासाठी... म्हणत कोरिओग्राफर आदिल खाननेही दिल्या न्यूड पोझ, झाला ट्रोल

Ranveer Singh : रणवीर हे तुझ्यासाठी... म्हणत कोरिओग्राफर आदिल खाननेही दिल्या न्यूड पोझ, झाला ट्रोल

रणवीर सिंगने (Ranveer Singh) न्यूड फोटोशूट केलं आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. या न्यूड फोटोशूटमुळे रणवीर कधी नव्हे इतका ट्रोल झाला. अगदी त्याच्याविरोधात पोलिस तक्रारही केली गेली. अर्थात अशास्थितीत बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक लोक रणवीरच्या पाठीशी उभे राहिले. रणवीरला सपोर्ट करणाऱ्यांमध्ये आता कोरिओग्राफर आदिल खान (Aadil Khan) याचं नावही सामील झालं आहे. आदिल खानने रणवीरला कसा सपोर्ट केला तर, स्वत: न्यूड पोझ देत. होय, रणवीरच्या समर्थनार्थ त्याने स्वत: न्यूड पोझ दिल्यात.

रणवीरच्या फोटोशूटमध्ये काहीही गैर नाही, हे सांगत आदिल खानने स्वत:चे न्यूड, सेमी न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात आदिल समुद्र किनाऱ्यावर पोझ देताना दिसत आहे. त्याची बॉडी लँग्वेज बघता या पोझ देताना तो अगदी कम्फर्टेबल होता, हे स्पष्टपणे जाणवतं. ‘एखादी व्यक्ती त्याच्या स्किनसोबत कम्फर्टेबल असेल तर, त्याला जे वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य आहे. हे माझ्या आवडत्या रणवर सिंगसाठी आहे. रणवीर  तू स्टार आहेस,’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

आदिलही झाला ट्रोल
आदिलने रणवीरला सपोर्ट करण्यासाठी न्यूड पोझ दिल्यात आणि रणवीरसारखाच तो सुद्धा ट्रोल झाला. अनेकांनी त्याला रणवीरचा भाऊ म्हटलं आहे. तुम्ही लोक देशात घाण पसरवत आहात, अशा शब्दांत एका युजरने त्याला सुनावलं आहे. काहींनी मात्र आदिलचा सपोर्ट केला आहे. तर काहींनी फोटोग्राफर कोण होता, अशा प्रश्न केला आहे.

Web Title: choreographer aadil khan poses nude in support of Ranveer Singh