तगडं VFX आणि दमदार अॅनिमेशन; 'चिरंजीवी हनुमान'चा टीझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:06 IST2025-12-18T18:05:26+5:302025-12-18T18:06:32+5:30
श्रीरामाचा भक्त आणि बलवान ताकदीचं प्रतिक असलेल्या बजरंगबलीवर हिंदीत एक नवा सिनेमा येतो आहे. 'चिरंजीवी हनुमान' असं या सिनेमाचं नाव असून याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

तगडं VFX आणि दमदार अॅनिमेशन; 'चिरंजीवी हनुमान'चा टीझर प्रदर्शित
विविध पौराणिक कथांनुसार सात चिरंजीवी अजूनही पृथ्वीवर वास्तव्य करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापैकीच एक म्हणजे हनुमान. श्रीरामाचा भक्त आणि बलवान ताकदीचं प्रतिक असलेल्या बजरंगबलीवर हिंदीत एक नवा सिनेमा येतो आहे. 'चिरंजीवी हनुमान' असं या सिनेमाचं नाव असून याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
टीझरमध्ये दिसतंय की निसर्गाचं नयनरम्य दृश्य दिसत आहे. हिरव्यागार पर्वतरांगांमधून निर्मळ पाण्याचे झरे वाहताना दिसत आहेत. त्या पर्वतरांगांमध्ये हनुमान उभे असल्याचं दिसत आहे. त्यानंतर आकाशात ते उंच झेप घेत असल्याचंही टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. हा एक अॅनिमेटेड सिनेमा असल्याचं टीझर पाहून लक्षात येतं. सिनेमात उत्तमरित्या व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन केल्याचं टीझरमध्ये दिसत आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी केलं आहे. तर आलोक जैन आणि अजित अंधारे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या नव्या वर्षात म्हणजे २०२६मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझर पाहून 'चिरंजीवी हनुमान' सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.