रश्मिका मंदाना की प्रिया वाॉरिअर? आज नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 11:47 AM2022-04-10T11:47:15+5:302022-04-10T11:48:37+5:30

South actress: फोटोत दिसणारी चिमुकली रश्मिका आहे की प्रिया यामध्ये नेटकरी कन्फ्युज आहेत.

challenge this cute girl seen in school dress with two braids has become national crush today | रश्मिका मंदाना की प्रिया वाॉरिअर? आज नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का?

रश्मिका मंदाना की प्रिया वाॉरिअर? आज नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का?

googlenewsNext

सध्या सोशल मीडियावर बालपणीचे वा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करायचा एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे. आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर केले आहेत. यात खासकरुन बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो विशेष व्हायरल झाले. मात्र, आता या सगळ्यात एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचा फोटो चर्चेत आला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत दिसणारी ही चिमुकली आज नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत असतात. त्यातच तिचा हा फोटो पाहिल्यावर नेटकरी सैराट झाले आहेत.

रश्मिका मंदाना आणि प्रिया वॉरिअर या दोन दाक्षिणात्य अभिनेत्री आजच्या घडीला नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे फोटोत दिसणारी चिमुकली रश्मिका आहे की प्रिया यामध्ये नेटकरी कन्फ्युज आहेत. मात्र,  रश्मिकाच्या चाहत्यांनी तिला बरोबर ओळखलं आहे. या फोटोत दिसणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाच (rashmika mandanna) आहे.

दरम्यान, अलिकडेच रश्मिका अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा' (pushpa)चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने श्रीवल्ली ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात पुन्हा अढळ स्थान निर्माण केलं. साऊथनंतर आता रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती 'मिशन मजनू'मध्ये दिसणार आहे. 
 

Web Title: challenge this cute girl seen in school dress with two braids has become national crush today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.