घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 10:31 IST2025-11-26T10:31:11+5:302025-11-26T10:31:39+5:30
सेलिना जेटलीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ, पोस्ट करत मांडलं दु:ख

घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
अभिनेत्री सेलिना जेटलीच्याघटस्फोटाची बातमी काल आली आणि सर्वांना धक्का बसला. ऑस्ट्रियाचा रहिवासी पीटर हागसोबत सेलिनाने १५ वर्षांचा संसार मोडला. त्यांना तीन मुलं आहेत त्यातील दोन जुळी आहेत. सेलिनाने पीटरवर कौटुंबिक हिंसाचार, शारिरीक, मानसिक छळाचा आरोप केला आहे. याविरोधात तिने मुंबई कोर्टात याचिका दाखल केली आहे. या सगळ्यानंतर आता सेलिनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्व प्रकार सांगितला आहे.
सेलिना जेटलीने आपला फोटो पोस्ट करत लिहिले, "#धैर्य, #घटस्फोट..माझ्या आयुष्यात आलेल्या या सर्वात मोठ्या वादळाचा मला एकटीलाच सामना करावा लागत आहे याची मला मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी कधीच हा विचार केला नव्हता की एक दिवस असा येईल जेव्हा माझ्या आयुष्यातले सगळे खांब ज्यांच्यावर माझं छत अवलंबून होतं ते माझे आईवडील, माझा भाऊ, माझी मुलं आणि ज्याने माझ्यासोबत कायम उभं राहण्याचं, माझ्यावर प्रेम करण्याचं, माझी काळजी घेण्याचं आणि माझ्यासोबत प्रत्येक अडचणींना सामोरं जाण्याचं वचन दिलं होतं ते सगळेच दुरावतील.
आयुष्यात माझं सगळं काही हिरावलं गेलं आहे ज्यांच्यावर माझा विश्वास होता ते निघून गेले, ज्या वचनांवर मला विश्वास होता ती वचनंही तुटली पण या वादळामुळे मी बुडालेले नाही. त्याने मला सावरलं, जीवघेण्या पाण्यातून गरम रेतीवर आणून फेकलं, या वादळानेच मला माझ्यातील स्त्री जी मरण नाकारत आहे तिला जागं केलं."
"मी सैनिकाची मुलगी आहे..धैर्य, शिस्त, हिंमत,लवचिकता, जोश आणि विश्वास या आधारावर मी लहानाची मोठी झाली आहे. जेव्हा तुम्हाला जग खाली पाडतं तेव्हा उठून उभं राहायचं असंत हे मला शिकवलं गेलं आहे. जेव्हा हृदय तुटत असतं तेव्हा लढायचं असतं, अन्याय होत असतो तेव्हा दया दाखवायची नसते. असंभव वाटणाऱ्या गोष्टीतूनही बाहेर पडायचं असतं हे मी शिकले आहे. माझ्या सैनिक भावासाठी लढणं, मुलांच्या प्रेमासाठी लढणं आणि माझ्या आत्मसम्मानासाठी लढणं ही माझी आता प्राथमिकता आहे. माझ्यावर झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराविरोधात तक्रार दाखल केली आहे."