पंकज त्रिपाठींच्या बहिणीच्या अपघाताचा व्हिडीओ आला समोर; CCTV फुटेज पाहून येईल अंगावर काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 10:09 IST2024-04-22T10:09:14+5:302024-04-22T10:09:37+5:30

Pankaj tripathi: या भीषण अपघातात पंकज यांच्या भावोजींचा मृत्यू झाला आहे. तर, बहिणीवर उपचार सुरु आहेत.

cctv-video-of-pankaj-tripathi-sister-accident-surfaced-car-blown-to-pieces-after-hitting-divider | पंकज त्रिपाठींच्या बहिणीच्या अपघाताचा व्हिडीओ आला समोर; CCTV फुटेज पाहून येईल अंगावर काटा

पंकज त्रिपाठींच्या बहिणीच्या अपघाताचा व्हिडीओ आला समोर; CCTV फुटेज पाहून येईल अंगावर काटा

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी (pankaj tripathi)  यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांच्या बहिणीचा आणि भावोजींचा मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या भावोजींचा मृत्यू झाला असून बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

 धनबादमधील जीटी रोडवर पंकज त्रिपाठींच्या बहिणीचा आणि भावोजींच्या कारचा भीषण अपघात झाला.  या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ज्यात हा भीषण अपघात कसा झाला ते दिसून येत आहे. पंकज त्रिपाठीचे भावोजी रस्त्यावर भरधाव वेगाने येत होते. त्याचवेळी त्यांची कार अचानक डिवाइडरवर धडकली.

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, पंकज त्रिपाठीचे भावोजी राकेश तिवारी कार चालवत होते आणि कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी राकेश आणि सरिता यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. परंतु, राकेश यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर, सरिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

Web Title: cctv-video-of-pankaj-tripathi-sister-accident-surfaced-car-blown-to-pieces-after-hitting-divider