"'धुरंधर २'च्या रिलीजआधी पहाटे अडीच वाजता आदित्यने..."; मुकेश छाब्राचा मोठा खुलासा, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:57 IST2026-03-19T13:55:09+5:302026-03-19T13:57:12+5:30
'धुरंधर २'चे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक थक्क करणारा किस्सा शेअर केला आहे. जो वाचून तुम्हीही थक्क व्हाल

"'धुरंधर २'च्या रिलीजआधी पहाटे अडीच वाजता आदित्यने..."; मुकेश छाब्राचा मोठा खुलासा, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशामागे दिग्दर्शक आदित्य धरने किती मेहनत केली आहे, याचा खुलासा झालाय. 'धुरंधर २'चे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक थक्क करणारा किस्सा शेअर केला असून, प्रदर्शनाच्या दिवशी पहाटेपर्यंत आदित्य धर कामात किती व्यस्त होता, याचा खुलासा केला आहे.
मुकेश छाब्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले की, आज 'धुरंधर २' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, पण आजच्या दिवशी पहाटेपर्यंत आदित्य धर चित्रपटाच्या कामात व्यस्त होता. रिलीजच्या दिवशी पहाटेपर्यंत लॅपटॉपसमोर बसून चित्रपटाच्या काही तांत्रिक बाबींवर आणि इतर कामांवर आदित्य लक्ष ठेवून होता. मुकेश यांच्या मते, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सहसा दिग्दर्शक निवांत असून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट बघतात. पण आदित्य मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना सर्वोत्तम अनुभव मिळावा यासाठी अथक मेहनत घेत होता.
This morning at 2:30 a.m., he was still working giving everything to the film till the very last moment. That kind of dedication is rare, and honestly, it’s inspiring.
— Mukesh Chhabra CSA (@CastingChhabra) March 19, 2026
I won’t say much because I’ve already seen the film twice… but trust me, this is going to shake everything.… pic.twitter.com/ot5aJvxknV
या पोस्टमध्ये छाब्रा यांनी आदित्य धरविषयी म्हटलं की, "जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर इतकं प्रेम करता, तेव्हाच अशी निष्ठा बघायला मिळते. धुरंधर २ आज रिलीज होतोय पण पहाटे अडीचपर्यंत आदित्यने चित्रपटावर बारकाईने काम केलं. आदित्यला असं काम करताना पाहून मला त्याचं खूप कौतुक वाटलं. आदित्यच्या याच मेहनतीचं फळ आज बॉक्स ऑफिसवर दिसत आहे."
Box Office वर धुरंधर
दिग्दर्शक आदित्य धरच्या या मेहनतीमुळेच 'धुरंधर २'ने पहिल्याच दिवशी ५० कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला आहे. सेन्सॉर बोर्डाचे कट्स आणि तांत्रिक आव्हाने असूनही, आदित्यने डगमगून न जाता चित्रपट यशस्वीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. रणवीर सिंगच्या जबरदस्त परफॉर्मन्सला आदित्य धर यांच्या कल्पक दिग्दर्शनाची जोड मिळाल्याने हा चित्रपट २०२६ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरण्याच्या मार्गावर आहे.