Kangana Ranaut : म्हणे, 70 टक्के आकडे फेक...; कंगना राणौतने पुन्हा उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 13:47 IST2022-09-11T13:46:45+5:302022-09-11T13:47:40+5:30
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा एकदा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटावर टीका केली आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीवर तिने प्रतिक्रिया दिली आहे...

Kangana Ranaut : म्हणे, 70 टक्के आकडे फेक...; कंगना राणौतने पुन्हा उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा सिनेमा 9 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि रिलीजच्या पहिल्या दिवशीच या चित्रपटाने वर्ल्डवाईड 75 कोटी कमाई करत एक नवा विक्रम रचला. पण आता ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचे हे आकडे खोटे असल्याचा दावा केला जात आहे आणि हा दावा करणारी दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) आहे.
रविवारी कंगनाने एक इन्स्टास्टोरी शेअर केली आणि या इन्स्टास्टोरीत तिने ‘ब्रह्मास्त्र’वर निशाणा झाला. कंगनाने निर्माता-लेखक एरे मृदुला कॅथर यांचं एक ट्विट शेअर करत, ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली उडवली आहे.
‘काही ट्रेड अॅनालिस्ट ब्रह्मास्त्रच्या बॉक्स ऑफिसचे आकड्यांची छेडछाड करून ते सादर करत आहेत. बॉक्स ऑफिस आकड्या खेळ करणाऱ्या या लोकांना यासाठी मोठी रक्कम दिली जाते. ही आकड्यांची हेराफेरी भारतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी हेराफेरी म्हटली जाऊ शकले. यात 50-70 टक्के आकडे फेक आहेत, असं ट्विट निर्माता-लेखक एरे मृदुला कॅथर यांनी केलं आहे. कंगनाने हे ट्विट रिशेअर करत, ‘ब्रह्मास्त्र’ची मजा घेतली आहे. ‘वाह, हा नवा निच्चांक आहे, 70 टक्के,’ अशा शब्दांत कंगनाने ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सला जोरदार टोला लगावला आहे.
कंगनाने शनिवारी पोस्ट शेअर करत, ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्यावर जबरदस्त टीका केली होती. ‘अयान मुखर्जीजा जिनीअस म्हणणाऱ्यांना तुरुंगात डांबलं पाहिजे. अयानने ब्रह्मास्त्रवर 600 कोटी बर्बाद केलेत,’असं ती म्हणाली होती.
‘असं तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही एखादं खोटें लपवण्याचा प्रयत्न करता. आलिया व रणबीर हे सर्वांत उत्तम कलाकार आहे, अयान मुखर्जी सर्वांत गुणी दिग्दर्शक आहे, असं म्हणावं यासाठी करण जोहर प्रत्येक शोमध्ये समोरच्या व्यक्तीवर दबाव टाकतो. सर्वजण हळूहळू त्याच्या खोटं बोलण्यावर विश्वास ठेवू लागले आहेत. 600 कोटी बजेट असणाऱ्या चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकाने त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकही चांगली चित्रपट दिलेला नाही. त्यांची गटबाजी आता त्यांनाच भारी पडत आहे. मीडियाला कंट्रोल करणं, केआरकेला तुरुंगात टाकणं, पेड रिव्ह्यू, पेड तिकिटं... ते कधीच इमानदारीने काम करत नाहीत. त्यांनी इमानदारीनं एकही चित्रपट तयार केलेला नाही. जे कोणी अयान मुखर्जीला हुशार म्हणत आहेत, त्याला तुरुंगात टाकले पाहिजे. त्याने 600 कोटी फुंकले,’ अशा आशयाची पोस्ट कंगनाने केली होती.