Brahmastra Part 2 : कधी येतोय ‘ब्रह्मास्त्र 2’? कोण साकारणार देव? अयान मुखर्जीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 10:44 AM2022-09-14T10:44:47+5:302022-09-14T10:45:35+5:30

Brahmastra 2 Release Date : ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यानंतर साहजकिच ‘ब्रह्मास्त्र 2’ची चर्चा सुरू झाली आहे आणि आता अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र 2’बद्दल एक मोठी घोषणा केली आहे.

brahmastra 2 will release in december 2025 ayan mukerji on dev | Brahmastra Part 2 : कधी येतोय ‘ब्रह्मास्त्र 2’? कोण साकारणार देव? अयान मुखर्जीचा मोठा खुलासा

Brahmastra Part 2 : कधी येतोय ‘ब्रह्मास्त्र 2’? कोण साकारणार देव? अयान मुखर्जीचा मोठा खुलासा

googlenewsNext

ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाच्या कमाईचे आकडे सुखावणारे आहेत. केवळ पाचच दिवसांत या सिनेमाने 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यानंतर साहजकिच ‘ब्रह्मास्त्र 2’ची (Brahmastra 2) चर्चा सुरू झाली आहे आणि आता अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र 2’बद्दल एक मोठी घोषणा केली आहे. होय, ट्रायलॉजी सीरिजचा दुसरा पार्ट अर्थात ‘ब्रह्मास्त्र 2’ 2025च्या अखेरपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
पहिल्या पार्टमध्ये शिवाची कहाणी आपण बघितली. दुसऱ्या पार्टमध्ये देवची (Brahmastra Part Two Dev) कथा दाखवली जाणार आहे. तुम्ही ‘ब्रह्मास्त्र’ पाहिला असेल तर याची हिंट तुम्हाला मिळाली असेलच. ‘ब्रह्मास्त्र 2’च्या पार्श्वभूमीवर अयान मुखर्जीने ‘आज तक’ला खास मुलाखत दिली.

काय म्हणाला अयान?
मी फक्त लोकांची उत्सुकता वाढवतो आहे. देव या कॅरेक्टरबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण व्हावी, अशी माझी इच्छा आहे. देव हे कॅरेक्टर कोण साकारणार? हे मी सध्या सांगणार नाही. पण वेळ येताच मी स्वत: या नावाचा खुलासा करेल. सध्या आम्ही क्रिएटीव्ह लेव्हलवर नावांवर चर्चा करतोय. पण काही आठवड्यात मी ‘ब्रह्मास्त्र 2’च्या कामाला सुरूवात करतोय. ‘ब्रह्मास्त्र’ तयार होत असतानाच दुसऱ्या पार्टची कहाणी तयार होत होती. देव एक प्रकारे सर्व अस्त्रांच्या दुनियेचा केंद्र असेल. मला विश्वास आहे की, चित्रपटाचा दुसरा पार्टही लोकांना आवडेल. लोकांना मी यासाठी दशकभर प्रतीक्षा करायला लावणार नाही. 2025च्या डिसेंबरपर्यंत दुसरा भाग रिलीजसाठी तयार असेल, हाच माझा प्रयत्न राहिल. आता आमच्याकडे अनुभव आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर आहेत, असं अयान म्हणाला.
दुसऱ्या पार्टचं शूटींग कधी सुरू होईल, याबाबत अयानने खुलासा केलेला नाही. पण त्याच्या बोलण्यावरून लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा होईल, असं दिसतंय. यात देवची भूमिका कोण साकारणार, हेही लवकरच कळणार आहे.

ते मला 10 पैकी 10 मार्क्स देतील...
स्टोरी व डायलॉग्सवरून ‘ब्रह्मास्त्र’ला अनेकांनी ट्रोल केलं आहे. यावरही अयान बोलला. मी फिडबॅकचं नेहमी स्वागत केलं आहे. ब्रह्मास्त्रची स्टोरी आणि डायलॉग्समध्ये मजा नाही, अशा काही प्रतिक्रिया उमटल्या. मी निश्चितपणे या प्रतिक्रिया गंभीरपणे घेतल्या आहेत. मी यावर निश्चितपणे काम करून आणि पुढच्या पार्टमध्ये या त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटी सिनेमा प्रेक्षकांसाठी आहे. दुसरा पार्ट पाहिल्यावर प्रेक्षक मला 10 पैकी 10 मार्क्स देतील, अशी मला आशा असल्याचं तो म्हणाला.
 

Web Title: brahmastra 2 will release in december 2025 ayan mukerji on dev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.