'मिर्झापूर' फेम ब्रह्मा मिश्राच्या मृत्यूनंतर व्हायरल झाला त्याचा अखेरचा व्हिडीओ, भावुक झाले फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 12:10 IST2021-12-03T12:09:13+5:302021-12-03T12:10:49+5:30

Brahma Mishra Dead: ब्रह्माच्या अकाली निधनानं चाहत्यांना जबर धक्का बसला असताना त्याचा अखेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Brahma Mishra Dead Mirzapur Actor Brahma Mishra Last Video Of Dancing Goes Viral After His Sudden Death Fans Get Emotional | 'मिर्झापूर' फेम ब्रह्मा मिश्राच्या मृत्यूनंतर व्हायरल झाला त्याचा अखेरचा व्हिडीओ, भावुक झाले फॅन्स

'मिर्झापूर' फेम ब्रह्मा मिश्राच्या मृत्यूनंतर व्हायरल झाला त्याचा अखेरचा व्हिडीओ, भावुक झाले फॅन्स

मांझी, मिझार्पूर, केसरी यांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता ब्रह्मा मिश्रा  (Brahma Mishra) याच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मनं जिंकणा-या ब्रह्मा मिश्राचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत त्याच्या राहत्या फ्लॅटमधील बाथरूमध्ये आढळून आला.  त्याच्या खोलीतून दुगंर्धी येत असल्याने शेजाºयांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी खोलीचं दार उघडून पाहिलंअसता बाथरूममधून ही दुर्गंधी असल्याचं समजलं. ब्रह्मा बाथरूमला गेला असता त्याचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ब्रह्माच्या अकाली निधनानं चाहत्यांना जबर धक्का बसला असताना त्याचा अखेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून ब्रह्माचे चाहते भावुक झाले आहेत. या व्हिडीओत ब्रह्मा मिश्राआपल्या एका मित्रासोबत In Da Ghettoवर डान्स करताना दिसतोय. 

 29 नोव्हेंबर रोजी छातीत दुखू लागल्यानं ब्रह्मा डॉक्टरांकडे गेला होता. मात्र डॉक्टरांनी  अ‍ॅसिडीटीचे औषध देऊन त्यांला घरी पाठवलं होतं. अशात घरीच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झालं असावं, अशी चर्चा आहे. 
ब्रह्माने मुंबईत अनेक वर्ष स्ट्रगल केला. अखेर 2013 साली ‘चोर चोर सुपर चोर’ हा सिनेमा त्याला मिळाला. यावर्षी रिलीज झालेला ‘हसीन दिलरूबा’ हा त्याचा अखेरचा सिनेमा ठरला. ‘मिझार्पूर 2’मध्ये त्याने साकारलेली ललित ही भूमिका हिट ठरली होती.   अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या चित्रपटातही तो झकळला होता. शिवाय मांझी- द माऊंटन मॅन, बद्री की दुल्हनिया, सुपर 30, दंगल या सिनेमातही त्यानं महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

Web Title: Brahma Mishra Dead Mirzapur Actor Brahma Mishra Last Video Of Dancing Goes Viral After His Sudden Death Fans Get Emotional