रक्ताने माखलेला चेहरा अन् हातात बंदूक; 'बॉर्डर २'मधला अहान शेट्टीचा फर्स्ट लूक समोर, सुनील शेट्टी म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:58 IST2025-12-09T12:58:05+5:302025-12-09T12:58:24+5:30
सुनील शेट्टीचा लेक आणि बॉलिवूड अभिनेता अहान शेट्टीचीही 'बॉर्डर २'मध्ये वर्णी लागली आहे. 'बॉर्डर २'मध्ये अहान भारतीय सैनिकाच्या लूकमध्ये दिसणार आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

रक्ताने माखलेला चेहरा अन् हातात बंदूक; 'बॉर्डर २'मधला अहान शेट्टीचा फर्स्ट लूक समोर, सुनील शेट्टी म्हणाला...
'धुरंधर'नंतर आता 'बॉर्डर २' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे. या सिनेमात अनेक नवे चेहरे दिसणार असून सिनेमाची स्टारकास्टही तगडी आहे . सुनील शेट्टीचा लेक आणि बॉलिवूड अभिनेता अहान शेट्टीचीही 'बॉर्डर २'मध्ये वर्णी लागली आहे. 'बॉर्डर २'मध्ये अहान भारतीय सैनिकाच्या लूकमध्ये दिसणार आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
टी सीरिज फिल्म्सच्या ऑफिशियल सोशल मीडियावरुन 'बॉर्डर २'मधील अहानच्या लूकचं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरवर अहान शेट्टी सैनिकाच्या पोशाखात दिसत आहे. त्याचा चेहरा रक्ताने माखला आहे. तर हातात बंदूक घेऊन तो युद्धभूमीवर शत्रूंशी दोन हात करत असल्याचं पोस्टरवर दिसत आहे. अहान शेट्टीचा हा फर्स्ट लूक पाहून सुनील शेट्टीही थक्क झाला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरुन अहानचं पोस्टर शेअर केलं आहे. "सन्मान त्याच्या खुणा सोडून जातो आणि धैर्य तुझ्यावर खूप शोभून दिसतं", असं कॅप्शन सुनील शेट्टीने दिलं आहे.
'बॉर्डर २' सिनेमात अहान शेट्टीसोबत सनी देओल, दिलजीत दोसांझ, वरुण धवन, सोनम बाजवा, मोना सिंग, मेधा राना यांच्या मुख्य भूमिका आहेत. अनुराग सिंग या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. २३ जानेवारी २०२६ रोजी 'बॉर्डर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.