Video: "तुम्हाला हे वागणं शोभतं का?" बोनी कपूर यांनी प्रियामणीसोबत केलेल्या 'या' कृतीने भडकले नेटकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 15:30 IST2024-04-10T15:28:19+5:302024-04-10T15:30:23+5:30
बोनी कपूर यांनी प्रियामणीसोबत केलेल्या एका कृतीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. काय म्हणाले बोनी कपूर बघा (boney kapoor, priyamani, ajay devgn, maidaan)

Video: "तुम्हाला हे वागणं शोभतं का?" बोनी कपूर यांनी प्रियामणीसोबत केलेल्या 'या' कृतीने भडकले नेटकरी
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते म्हणजे बोनी कपूर. बोनी यांची निर्मिती असलेले बहुतांश सिनेमे बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरले आहेत. बोनी कपूर यांची निर्मिती असलेला 'मैदान' सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. 'मैदान' चं स्क्रीनींग नुकतंच पार पडलं. या स्क्रीनींगला सिनेमातले कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. या स्क्रीनींगच्या वेळी सिनेमात विशेष भूमिकेत झळकलेली अभिनेत्री प्रियामणीही उपस्थित होती. त्यावेळी बोनी कपूर यांनी प्रियामणीसोबत केलेल्या कृतीने नेटकरी बोनी यांच्यावर नाराज झाले आहेत.
'मैदान' च्या स्क्रीनींगच्या वेळचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत स्क्रीनींगच्या वेळी प्रियामणी पारंपरिक साडी नेसून उपस्थित होती. त्यावेळी बोनी यांनी प्रियामणीचं स्वागत केलं. पुढे प्रियामणीसोबत फोटोशूट करताना बोनी यांनी तिच्या कमरेला आणि खांद्याला हात लावला. यामुळे नेटकऱ्यांनी बोनी यांच्यावर चांगलाच राग काढला. व्हिडीओत पाहिलं तर प्रियामणीही यामुळे अवघडल्यासारखी दिसत होती.
Boney Kapoor at it again
byu/saurabhagarwal8 inBollyBlindsNGossip
बोनी कपूर आणि प्रियामणी यांचा हा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी बोनी यांच्यावर नाराजी व्यक्त केली. "प्रियामणीसारख्या अभिनेत्रीला बोनी कपूर यांनी दिलेली वागणूक अत्यंत चुकीची आहे", "बोनी कपूर सेटवर इतर अभिनेत्रींशी कसा व्यवहार करत असतील", अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी बोनी कपूर यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय. प्रियामणी आणि अजय देवगण यांची प्रमुख भूमिका असलेला 'मैदान' सिनेमा उद्या ११ एप्रिलला रिलीज होतोय.