दिलजीत दोसांझला 'नो एन्ट्री-२' मधून काढलं? बोनी कपूर यांनी खरं काय ते सांगूनच टाकलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:02 IST2025-05-16T10:55:57+5:302025-05-16T11:02:12+5:30
दिलजीत दोसांझने 'नो एन्ट्री-२' मधून का घेतली एक्झिट? बोनी कपूर खुलासा करत म्हणाले...

दिलजीत दोसांझला 'नो एन्ट्री-२' मधून काढलं? बोनी कपूर यांनी खरं काय ते सांगूनच टाकलं, म्हणाले...
No Entry -2 :बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) सध्या त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'नो एन्ट्री-२' चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. या चित्रपटासाठी अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan),अर्जून कपूर (Arjun Kapoor)आणि दिलजीत दोसांझ हे नवे चेहरे फायनल करण्यात आले होते. २००५ मध्ये आलेल्या नो एन्ट्री सिनेमाच्या या सीक्वलसाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत. परंतु, अलिकडेच या चित्रपटातून दिलजीत दोसांझने एक्झिट घेतल्याची माहीती समोर आली आहे. त्यामुळे दिलजीतचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. काही मतभेदांमुळे दिलजीतने या चित्रपटासाठी नकार दिल्याचं काहींच म्हणणं होतं. यावर आता बोनी कपूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनिस बज्मी दिग्दर्शित 'नो एन्ट्री-२' मधून दिलजीत दोसांझने एक्झिट का घेतली? यावर बोनी कपूर यांनी भाष्य केलं आहे. 'हिंदुस्तान टाईम्स' सोबत संवाद साधताना बोनी कपूर म्हणाले की, "प्रोजेक्सटसाठी डेट्स मॅच होत नसल्यामुळे काही अडचणी येत आहेत. मात्र, सिनेमाच्या क्रिएटिव्ह गोष्टींबाबत कोणतेही मतभेद नाहीत. या सगळ्या अफवा आहेत. त्यामुळे आम्ही तारखा कशा जुळून येतील याकडे लक्ष देत आहोत." असा खुलासा करत बोनी कपूर अफवांचं खंडण केलं
दरम्यान, 'नो एंट्री' सिनेमाच्या पहिल्या भागात सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान अशी तगडे कलाकार होते. हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.