Vicky Kaushal : अरेरे! विकी कौशलने केली रणबीर कपूरची पोलखोल; सांगितलं अभिनेत्याचं 'ते' सीक्रेट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:12 IST2023-06-08T16:46:35+5:302023-06-08T17:12:01+5:30
Vicky Kaushal And Ranbir Kapoor : एका मुलाखतीत विकी कौशल रणबीर कपूरबद्दल बोलला आणि त्याची काही सीक्रेट्स उघड केली आहेत.

Vicky Kaushal : अरेरे! विकी कौशलने केली रणबीर कपूरची पोलखोल; सांगितलं अभिनेत्याचं 'ते' सीक्रेट, म्हणाला...
अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. आतापर्यंत अभिनेता अनेक कार्यक्रम आणि पत्रकार परिषदांचा भाग होता. तर, अशाच एका मुलाखतीत विकी कौशलरणबीर कपूरबद्दल बोलला आणि त्याची काही सीक्रेट्स उघड केली आहेत. विकी कौशल आणि रणबीर कपूर यांनी 2018 मध्ये आलेल्या संजय दत्त बायोपिक संजूमध्ये एकत्र काम केले होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला.
जरा हटके जरा बचकेच्या प्रमोशनदरम्यान एका चॅनलशी संवाद साधताना विकी कौशलने रणबीर कपूरच्या एक हटके आणि एक बचके या सवयीबद्दल सांगितले. जेव्हा जेव्हा रणबीरने एखाद्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली तेव्हा तो ती सेटवर कधीही दाखवत नाही. विकी म्हणाला, "रणबीर माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. रणबीरची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो एक व्यक्ती म्हणून आणि अभिनेता म्हणून सिक्योर राहतो. जेव्हा तो एखाद्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो तेव्हा तो कधीच सेटवर ते आणत नाही."
"एक अभिनेता म्हणून तो कधीच दाखवत नाही की मी खूप मेहनत करत आहे. तो ते गांभीर्याने घेत नाही. तो जे काही करतो ते पडद्यामागे करतो आणि सेटवर तो फक्त काम करतो, जे विलक्षण आहे." रणबीर कपूरच्या बालिश सवयीबद्दल बोलताना विकीने खुलासा केला की, अभिनेता कधी कधी काहीतरी सांगतो आणि म्हणतो की मी फक्त तुम्हाला सांगत आहे आणि कोणालाही कळू नये. ही गोष्ट त्यानेच अर्ध्या जगाला सांगितल्याचं नंतर कळतं.
विकी म्हणाला, "रणबीरची एक बालिश गोष्ट आहे की तो तुम्हाला सांगेल, 'यार, ऐक ना मी तुला एक गोष्ट सांगत आहे. कोणाला सांगू नकोस. मी फक्त तुला सांगतोय. तुम्हाला काळजी वाटेल की जर ही गोष्ट कुठेतरी बाहेर पडली तर खापर माझ्यावर फुटेल की मी हे कोणाला सांगितलं असेल. पण मग तुमच्या लक्षात येईल की किमान 150 लोकांना याबद्दल आधीच माहिती आहे आणि या 150 लोकांना त्याने सांगितले की कोणाला सांगू नकोस भाऊ, मी तुला आत्ताच सांगितलं." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.