'या' अभिनेत्यामुळे तब्बू आजही अविवाहित, वयाच्या 54 व्या वर्षीही जगतीये सिंगल आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:30 IST2026-02-20T10:30:00+5:302026-02-20T10:30:00+5:30
Tabu: तब्बूने वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र, अद्यापही ती अविवाहित आहे. त्यामुळे ५४ वर्षाच्या या अभिनेत्रीने अद्यापही लग्न का केलं नाही असा प्रश्न चाहत्यांना पडतो

'या' अभिनेत्यामुळे तब्बू आजही अविवाहित, वयाच्या 54 व्या वर्षीही जगतीये सिंगल आयुष्य
बॉलिवूडची लोकप्रिय आणि तितकीच चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या तब्बूला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आज इंडस्ट्रीत तिने तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. तब्बू तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही कायम चर्चेत येत असते. यात खासकरुन तिच्या लग्नाची चर्चा होतांना दिसते.
तब्बूने वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र, अद्यापही ती अविवाहित आहे. त्यामुळे ५४ वर्षाच्या या अभिनेत्रीने अद्यापही लग्न का केलं नाही असा प्रश्न चाहत्यांना पडतो. विशेष म्हणजे तब्बूच्या अविवाहित असण्यामागे एक दिग्गज अभिनेता कारणीभूत असल्याचंही म्हटलं जातं.
तब्बूने एका मुलाखतीमध्ये तिच्या अविवाहित असण्यामागचं कारण सांगितलं आहे. मला सिंगल रहायलाच आवडतं. "मला माझ्या आयुष्यात अजून कोणाच्या अडचणींची भर घालायची नाहीये", असं तब्बू म्हणाली होती. यावेळी तिने अजय देवगणमुळे अविवाहित असल्याचंही सांगितलं.
पुढे ती म्हणते, "अजय देवगण आणि माझा चुलत भाऊ समीर आर्य हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ते दोघंही माझ्यावर करडी नजर ठेवायचे. मी कोणत्याही मुलाशी बोलले तर लगेच हे तिकडे जाऊन त्या मुलाला मारायचे. मी अजयला पण कितीतरी वेळा सांगितलं की माझ्यासाठी चांगला मुलगा शोध. पण, त्याला आजतागायत कोणता मुलगा भेटलेला नाही. त्यामुळे अजयमुळेच मी आजपर्यंत अविवाहित आहे", असं मजेशीर अंदाजात तब्बूने म्हटलं.
तब्बूच्या अफेअर्सची बॉलिवूडमध्ये चर्चा
इंडस्ट्रीमध्ये तब्बूचं नाव अनेक कलाकारांसोबत जोडलं गेलं. यात साजिद नाडियादवाला, संजय कपूर, अजय देवगण, नागार्जुन या कलाकारांसोबत तब्बूचं नाव जोडलं गेलं होतं. विशेष म्हणजे नागार्जुन आणि तब्बू यांनी जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केलं. मात्र, त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. कारण, नागार्जुनचं लग्न झालेलं होतं.
दरम्यान, तब्बूचं खरं नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असं आहे. मात्र, इंडस्ट्रीत येतांना तिने फक्त तब्बू याच नावाची निवड केली. तब्बूने १९८२ मध्ये रिलीज झालेल्या बाजार या सिनेमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या सिनेमात तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर तिने 'विजयपथ', हकीकत, हिम्मत, तू चोर मैं सिपाही, माचिस, विरासत, बॉर्डर, चाची 420, हम साथ साथ है, हेरा फेरी, शिकारी, चांदनी बार, जाल, मकबूल, हैदर, दृश्यम, अंधाधुन, भारत, औरों में कहां दम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं.