एकेकाळी दिसण्यावरुन झाला ट्रोल, त्याच स्टारकिडने अभिनयाच्या जोरावर केलं स्वत:ला सिद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 10:10 IST2026-03-02T10:09:30+5:302026-03-02T10:10:16+5:30

Bollywood actor: अनेकदा स्टारकिड्स त्यांच्या वागणुकीमुळे किंवा त्यांच्या अभिनयामुळे ट्रोल होतात.

bollywood-star-kid-trolled-for-looks-then-tiger-shroff-created-comeback-with-war | एकेकाळी दिसण्यावरुन झाला ट्रोल, त्याच स्टारकिडने अभिनयाच्या जोरावर केलं स्वत:ला सिद्ध!

एकेकाळी दिसण्यावरुन झाला ट्रोल, त्याच स्टारकिडने अभिनयाच्या जोरावर केलं स्वत:ला सिद्ध!

बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सची चर्चा होत असते. यात अनेकदा हे स्टारकिड्स त्यांच्या वागणुकीमुळे किंवा त्यांच्या अभिनयामुळे ट्रोल होतात. अशाच ट्रोलिंगचा सामना अभिनेता जॅकी श्रॉफ ( Jackie Shroff ) यांच्या लेकाला म्हणजेच टायगर श्रॉफला करावा लागला होता. मात्र टायगरने त्याच्या अभिनयातून स्वत:ला सिद्ध केलं.

बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून टायगर श्रॉफ (tiger shroff) ओळखला जातो. आज त्याने इंडस्ट्रीत त्याचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, स्टारकिड असूनही त्याच्या वाट्याला आलेला स्ट्रगल काही चुकला नाही. सुरुवातीच्या काळात अनेकांनी त्याला दिसण्यावरुन ट्रोल केलं होतं.

टायगरने साजिद नाडियाडवाला यांच्या 'हिरोपंती' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात त्याने अॅक्शन सीन करुन प्रेक्षकांचं लक्ष  वेधून घेतलं. मात्र, अनेकांनी त्याला दिसण्यावर बरंच ट्रोल केलं.परंतु, या ट्रोलिंगकडे लक्ष न देता त्याने त्याच्या कामावर फोकस केला आणि अभिनयाच्या जोरावर ट्रोल करण्यांची तोंड बंद केली. या सिनेमासाठी त्याला बेस्ट डेब्यू म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

हिरोपंतीच्या यशानंतर टायगरने 'बागी', 'वॉर' यांसारखे सुपरहिट सिनेमा दिले. या सिनेमांनंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. 'वॉर' हा सिनेमात तर त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. अभिनयासोबतच टायगर त्याच्या फिटनेसवरही तितकाच भर देतो. त्यामुळे आज तो अनेकांचा फिटनेस आयकॉन आहे.

Web Title : टाइगर श्रॉफ: लुक्स के लिए ट्रोल, स्टार किड ने अभिनय से खुद को साबित किया!

Web Summary : टाइगर श्रॉफ को शुरू में उनके लुक्स के लिए ट्रोल किया गया, लेकिन उन्होंने अपनी एक्टिंग से आलोचकों को चुप करा दिया। उन्होंने 'हीरोपंती' से डेब्यू किया, जिससे उन्हें फिल्मफेयर पुरस्कार मिला। 'बागी' और 'वॉर' ने उनकी सफलता को मजबूत किया। अब एक फिटनेस आइकन, वह प्रेरित करते रहते हैं।

Web Title : Tiger Shroff: Trolled for looks, star kid proved himself through acting!

Web Summary : Tiger Shroff faced initial trolling for his appearance but silenced critics with his acting skills. He debuted with 'Heropanti,' earning a Filmfare award. 'Baaghi' and 'War' followed, solidifying his success. Now a fitness icon, he continues to inspire.