प्रेक्षक समोर असताना भर कॉन्सर्टदरम्यान आवाजच गेला अन्...; प्रसिद्ध गायिकेने स्वत:च सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:01 IST2025-10-29T13:53:43+5:302025-10-29T14:01:17+5:30
लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गायिकेने गमवलेला आवाज; नेमकं काय घडलेलं?

प्रेक्षक समोर असताना भर कॉन्सर्टदरम्यान आवाजच गेला अन्...; प्रसिद्ध गायिकेने स्वत:च सांगितला 'तो' किस्सा
Shreya Ghoshal : अनेक ख्यातनाम गायकांच्या कौतुकास पात्र ठरलेली, आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे श्रेया घोषाल.आज देशातील आघाडीच्या गायिकांमध्ये श्रेया घोषालचं नाव सामील आहे. फक्त बॉलिवूडच नव्हे तर तिने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी गाणी गायली आहेत. या गायिकेचा जगभरात चाहतावर्ग आहे. आपल्या चाहत्यांसाठी श्रेया अनेक ठिकाणी लाईव्ह कॉन्सर्ट करत असते. सध्या श्रेया घोषाल इंडियन आयडॉलच्या १६ व्या पर्वामुळे चर्चेत आहे. या शोमध्ये श्रेया घोषालने स्वतःशी संबंधित एक भावुक किस्सा शेअर केला.
श्रेया घोषाल भारतासह परदेशातही लाईव्ह कार्यक्रम करत असते. तिच्या संगीत मैफिलिंना चाहते प्रचंड गर्दी करतात. दरम्यान, अशाच एका कॉन्सर्टदरम्यान गाताना तिने तिचा आवाज गमवला होता. मात्र,डॉक्टरांच्या मदतीने तिचा आवाज पूर्वीसारखा झाला. इंडियन आयडॉलच्या सेटवर तिने या प्रसंगाबद्दल सांगितलं. खरंतर झालं असं की, इंडियन आयडॉल १६' च्या 'यादों की प्लेलिस्ट' एपिसोडमध्ये, स्पर्धक ज्योतिमाचा सादरीकरणादरम्यान अचानक आवाज गेला. त्यामुळे ती घाबरली. नंतर श्रेया घोषाल तिला थोड्यावेळासाठी स्टेजवरून निघून जायला सांगते. त्याचदरम्यान, श्रेया तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग सांगते -"माझ्यासोबत एकदा असं घडलं होतं. न्यू यॉर्कमधील एका कॉन्सर्ट दरम्यान ते घडलं. शो सुरू होण्यापूर्वीच मी माझा आवाज गेला होता. कॉन्सर्टची सगळी तिकिटं विकली गेलेली आणि असं झालं. पण, मी न घाबरता तीन तास लाईव्ह परफॉर्मन्स दिला. "
श्रेया घोषालने लहानपणापासून गायन क्षेत्रात करिअर करण्यास सुरुवात केली. टीव्हीवरील लोकप्रिय असलेल्या 'सा रे ग म प' या रिअॅलिटी शोची ती विजेती ठरली होती.श्रेयाने २००० मध्ये बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून पाऊल ठेवलं. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' या चित्रपटात तिला पहिल्यांदा गायनाची संधी मिळाली.'डोला रे डोला', 'सिलसिला ये चाहत का', 'चिकनी चमेली', 'तेरी मेरी', 'तेरे लिए' यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांना तिने आपला आवाज दिला आहे.