परेश रावल यांच्या 'हेरा फेरी-३' मधून एक्झिट घेण्यावर हिमेश रेशमिया काय बोलला? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 10:56 IST2025-06-02T10:53:04+5:302025-06-02T10:56:34+5:30
परेश रावल यांनी 'हेरा फेरी-३' मधून एक्झिट घेतल्यानंतर हिमेश रेशमियाची प्रतिक्रिया; म्हणाला-"त्यांचा अभिनय..."

परेश रावल यांच्या 'हेरा फेरी-३' मधून एक्झिट घेण्यावर हिमेश रेशमिया काय बोलला? जाणून घ्या
Himesh Reshammiya : मागील काही दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टीत 'हेरा फेरी-३' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांच्या चित्रपटातील एक्झिटनंतर प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात काम करण्यास नकार दिल्यानंतर परेश रावल चर्चेत आहेत. अभिनेत्याच्या या निर्णयानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावर त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकार देखील व्यक्त होताना दिसत आहेत. त्यात आता प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने (Himesh Reshammiya) प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, हिमेश रेशमियाने 'फिर हेरा फेरी' चित्रपटाला संगीत दिलं होतं. जे खूप लोकप्रिय झालं. यावर आता हिमेश रेशमियाने प्रतिक्रिया दिली आहे. हिमेश रेशमियाने नुकत्याच झालेल्या मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परेश रावल यांचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच त्यांच्या या निर्णयाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यादरम्यान, हिमेश रेशमिया म्हणाला, "'हेरा फेरी १' आणि 'हेरा फेरी २' मधील परेश रावल यांचा अभिनय अप्रतिम होता. त्यावेळी त्याने परेश राव यांचं कौतुक करत 'हेरा फेरी' चित्रपटातील 'जुम्मे रात' हे लोकप्रिय गाणं गायलं. " हिमेश रेशमियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परंतु, या लोकप्रिय फ्रॅंचायझीच्या तिसऱ्या भागात परेश रावल दिसणार नाहीत. त्यामुळे सिनेरसिकांची घोर निराशा झाली आहे.
दरम्यान, या कॉन्सर्टमध्ये हिमेश रेशमियाने 'याद सातये तेरी', 'हुक्का बार', 'मैं जहाँ रहूं', 'झलक दिखला जा', 'जरा झूम झूम' ही गाणी गायली. त्याच्या या कॉन्सर्टला फराह खान, वीर पहारिया, गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांसारखे कलाकार देखील उपस्थित होते.