भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध बॉलिवूड गायकाने घेतला मोठा निर्णय, शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:55 IST2025-05-09T12:52:49+5:302025-05-09T12:55:59+5:30
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध बॉलिवूड गायकाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या

भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध बॉलिवूड गायकाने घेतला मोठा निर्णय, शेअर केली पोस्ट
Arijit Singh: जम्मु-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ७ मे च्या दिवशी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत कारवाई केली. भारताने पाकिस्तानमधील दहशत वाद्यांच्या तळावर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हवाई हल्ले केले. ऑपरेश सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा तसेच अनेक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. अशातच बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने (Arijit Singh) या परिस्थिमुळे एक मोठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, ९ मे रोजी अबू धाबी येथे होणारा अरिजीत सिंहचा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. नुकतेच अरिजीतच्या टीमने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कॉन्सर्टशी संबंधित एक अपडेट शेअर केले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, "अलिकडे घडणाऱ्या घटनांमुळे आम्ही अबू धाबीमध्ये अरिजीत सिंहचा लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कॉन्सर्ट ९ मे २०२५ रोजी यास बेटावरील एतिहाद अरेना येथे होणार होता. पंरतु सद्याची परिस्थिती पाहाता तो कॉन्सर्ट रद्द करण्यात येत आहे. यावेळी आम्हाला तुमच्या संयमाची आणि पाठिंब्याची गरज आहे. लवकरच कॉन्सर्टची नवीन तारीख जाहीर केली जाईल.
यानंतर पुढे त्यांनी लिहिलंय, खरेदी केलेली सर्व तिकिटे पुढील तारखेपर्यंत वैध असतील किंवा ज्यांनी तिकिटे खरेदी केली आहेत त्यांना पूर्ण रिफंड मिळेल." असं त्यांनी या पोस्टद्वारे म्हटलं आहे.
दरम्यान, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिची निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे अरिजीत सिंहचा हा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे.