'स्वत:ला खूप सुंदर समजते', ऐश्वर्याला सेटवर पाहून सलमानने केला होता तमाशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 09:59 IST2026-03-05T09:43:15+5:302026-03-05T09:59:05+5:30
Salman khan: ऐश्वर्याला सेटवर पाहून सलमानने केला होता तमाशा; म्हणाला, 'तिला समजवा..'

'स्वत:ला खूप सुंदर समजते', ऐश्वर्याला सेटवर पाहून सलमानने केला होता तमाशा
बॉलिवूडमध्ये (bollywood) अनेक कलाकारांच्या लव्हस्टोरीजची चर्चा झाली. मात्र, यात सगळ्यात जास्त ज्यांचं प्रेमप्रकरण गाजलं ती जोडी म्हणजे ऐश्वर्या राय (aishwarya rai) आणि सलमान खान (salman khan). एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या जोडीने ब्रेकअप केला आणि अनेक चर्चांना उधाण आलं. या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. त्यातलाच एक सुपरहिट सिनेमामध्ये 'हम दिल दे चुके सनम'. हा सिनेमा दोघांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.
'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाच्या सेटवर सलमान-ऐश्वर्याच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. मात्र, सध्या या जोडीचा एक वेगळाच किस्सा गाजतोय. सिनेमाच्या सेटवर सलमान, ऐश्वर्यावर प्रचंड चिडला होता. इतकंच नाही तर तिला सौंदर्याची गुर्मी आहे असंही त्याने म्हटलं होतं.
'हम दिल दे चुके सनम'च्या वेळी सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात अनेक चढउतार सुरु होते. आणि, सलमान वेळोवेळी सेटवर त्याची नाराजीही व्यक्त करत होता. याच काळात ऐश्वर्या, रोहन सिप्पी यांच्या एका प्रोजेक्टमध्ये अभिषेक बच्चनसोबत काम करत होती. ज्यामुळे सलमानच्या रागाचा पारा आणखीनच वाढत होता.
ऐश्वर्यावर भडकला सलमान
ऐश्वर्या-अभिषेकच्या सिनेमाचं चित्रीकरण सुरु असताना अचानक सलमान सिनेमाच्या सेटवर पोहोचला. आणि, त्याने आगपाखड करायला सुरुवात केली. ऐश्वर्याचं वागणं त्याला सातत्याने खटकत होतं. त्यामुळे, स्वत:ला खूप सुंदर समजते. तिला जरा समजवा. वहिदा रहमान सारख्या अभिनेत्रींकडे बघ म्हणावं तिला, असं म्हणून सलमानने त्याचा राग व्यक्त केला.
दरम्यान, २००१ मध्ये ऐश्वर्याने सलमानसोबत ब्रेकअप केला. मात्र, ब्रेकअपचं हे सत्य सलमानला सहन होत नव्हतं. तो वारंवार तिला फोन, मेसेज करुन त्रास द्यायचा. इतकंच नाही तर तो तिच्यावर संशय देखील घ्यायचा असं म्हटलं जातं. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्यानेदेखील या गोष्टीचा खुलासा केला होता.