...म्हणून राणी मुखर्जी आहे सोशल मीडियापासून दूर; अभिनेत्रीने सांगून टाकलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 13:28 IST2024-03-06T13:27:26+5:302024-03-06T13:28:58+5:30

बॉलिवूडमधील बहुतांशी कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

Bollywood Rani Mukerji Reveals Why He Isn't On Social Media | ...म्हणून राणी मुखर्जी आहे सोशल मीडियापासून दूर; अभिनेत्रीने सांगून टाकलं खरं कारण

...म्हणून राणी मुखर्जी आहे सोशल मीडियापासून दूर; अभिनेत्रीने सांगून टाकलं खरं कारण

बॉलिवूडमधील बहुतांशी कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात, त्यांना फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून आपल्या चित्रपटांविषयी अपडेट देत असतात. आपल्या चित्रपटांचं प्रमोशनही ते सोशल मीडियावर करतात. खरं तर सोशल मीडियामुळे चाहते आणि कलाकार यांच्यात असणारी दरी कमी होते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण, असं असलं तरीही काही सेलिब्रिटी अपवाद आहेत. त्याच सेलिब्रिटींमधील एक नाव म्हणजे राणी मुखर्जी होय.

राणी मुखर्जी ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, जिची आजही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ती सोशल मीडियापासून कायम दूर राहते. राणी ही इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटर (आता X) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही. यामागचं कारण तिनं उघड केलं आहे. ती म्हणाली, माझे चाहते नेहमीच मला सपोर्ट करतात. मला प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम द्यायला आवडतं. पण, सोशल मीडियावर मी माझे 100 टक्के देऊ शकणार नाही. तसंच मला जास्तीचा भार उचलायचा नाही.  साधे जीवन जगणं आवडतं. त्यामुळे मी सोशल मीडियापासून दूर आहे'.

राणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती शेवटची 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' मध्ये दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. तिच्या पुढील चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये राणी सहभागी झाली होती. यावेळी मुलगी आदिरासोबत ती दिसून आली. दोघींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
 

Web Title: Bollywood Rani Mukerji Reveals Why He Isn't On Social Media