थिएटरमध्ये फ्लॉप झालेला आमिर खानच्या लेकाचा 'लव्हयापा' ओटीटीवर होणार रिलीज, कधी अन् कुठे बघाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:10 IST2025-04-01T12:31:43+5:302025-04-01T13:10:00+5:30
'लव्हयापा' सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार असून त्याविषयीची अपडेट समोर आली आहे (loveyapa)

थिएटरमध्ये फ्लॉप झालेला आमिर खानच्या लेकाचा 'लव्हयापा' ओटीटीवर होणार रिलीज, कधी अन् कुठे बघाल?
फेब्रुवारी महिना बॉलिवूड सिनेमांसाठी तसा चांगलाच गेला. कारण १४ फेब्रुवारीला रिलीज झालेला 'छावा' (chhaava movie) सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. परंतु 'छावा'च्या वादळात इतर सिनेमांच्या पदरी मात्र निराशा आली. असाच एक सिनेमा म्हणजे 'लव्हयापा'. आमिर खानचा (aamir khan) लेक जुनैद खान आणि श्रीदेवाची लेक खुशी कपूर या दोघांचा 'लव्हयापा' सिनेमा रिलीजआधी चर्चेत होता. परंतु सिनेमा रिलीज झाल्यावर चांगलाच फ्लॉप झाला. आता 'लव्हयापा' सिनेमा ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. जाणून घ्या.
'लव्हयापा' या ओटीटीवर होणार रिलीज
थिएटरमध्ये सपशेल अपयशी ठरलेला 'लव्हयापा' सिनेमा आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. ४ एप्रिलला जिओहॉटस्टार या ओटीटी अॅपवर 'लव्हयापा' सिनेमा रिलीज होईल. त्यामुळे ज्यांना 'लव्हयापा' थिएटरमध्ये बघण्याची इच्छा होती त्यांना ओटीटीवर हा सिनेमा घरबसल्या सहकुटुंब पाहता येईल. 'लव्हयापा' सिनेमाचं प्रमोशन,गाणी आणि गाण्यांच्या स्टेप्स तरुणाईमध्ये चांगल्याच चर्चेत होत्या. याशिवाय जुनैद-खुशीची खास केमिस्ट्रीही चर्चेत राहिली.
'लव्हयापा' सिनेमाविषयी
'लव्हयापा' हा सिनेमा हा मॉडर्न युगातील प्रेमकहाणीवर आधारित आहे. मनाला भिडणारं कथानक, उत्कृष्ट अभिनय आणि मजेदार संगीतने या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असणारा हा सिनेमा आहे. सिनेमातील जुनैद-खुशीच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं. याशिवाय हा सिनेमा २०२२ साली आलेल्या 'हिट लव्ह टुडे' या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. ७ फेब्रुवारी २०२५ ला हा सिनेमा रिलीज झाला होता.