प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रेग्नंट असताना शूट केला रेप सीन; 'त्या' एका चुकीमुळे जावं लागलं हॉस्पिटलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 01:51 PM2023-05-01T13:51:28+5:302023-05-01T13:52:21+5:30

Moushumi chatterjee: 'रोटी कपडा और मकान' सिनेमाच्या सेटवर घडला होता अभिनेत्रीसोबत अपघात

bollywood moushumi chatterjee shot a rape scene in pregnancy period during roti kapda aur makaan | प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रेग्नंट असताना शूट केला रेप सीन; 'त्या' एका चुकीमुळे जावं लागलं हॉस्पिटलमध्ये

प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रेग्नंट असताना शूट केला रेप सीन; 'त्या' एका चुकीमुळे जावं लागलं हॉस्पिटलमध्ये

googlenewsNext

बॉलिवूडला फार मोठा इतिहास लाभला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये कायम या झगमगत्या दुनियेची, त्यातील कलाकारांची चर्चा रंगत असते. यात सध्या ८०-९० चा काळ गाजवणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्री चर्चा रंगली आहे. या अभिनेत्री गरोदर असताना चक्क रेप सीन शूट केला होता. इतकंच नाही तर या सीनचं चित्रीकरण सुरु असताना तिचा गंभीर अपघातही झाला होता.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा लोकप्रिय चित्रपट म्हणजे 'रोटी कपडा और मकान'. या सिनेमात अभिनेत्री मौसमी चटर्जी हिने मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हा सिनेमा करत असताना त्या प्रेग्नंट होत्या. आणि, याच परिस्थितीत त्यांनी रेप सीनचं देखील चित्रीकरण केलं होतं. एका मुलाखतीत त्यांनी स्वत: याविषयी भाष्य केलं आहे.

''रोटी कपडा और मकान' या सिनेमाचं चित्रीकरण करत असताना मी प्रेग्नंट होते. त्या काळात मला एक रेप सीन करायचा होता. मात्र, हा सीन करत असताना माझ्या अंगावर पीठ पडलं. त्यात मला घाम आला होता. त्यामुळे हे पीठ माझ्या अंगाला चिकटलं. इतकंच नाही तर माझे केस लांबसडक होते. त्यामुळे केसांनाही ते चिटकून बसलं. त्यावेळी माझी झालेली ही अवस्था पाहून मला रडू कोसळलं. त्यामुळे मी रडता रडता खाली कोसळले. परिणामी, माझं ब्लिडिंग सुरु झालं. या अशा परिस्थितीत तात्काळ मला रुग्णालयात नेण्यात आलं. सुदैवाने माझ्या बाळाला काही झालं नाही," असं मौसमी यांनी सांगितलं.

दरम्यान, मौसमी चटर्जी यांनी 1967 साली बंगाली दिग्दर्शक तरुण मजुमदार यांच्या 'बालिका वधू' या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर 1972 मध्ये 'अनुराग' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. त्यांचे 'कच्चे धागे', 'जहरीला इंसान', 'स्वर्ग नरक', 'फूलखिले हैं गुलशन गुलशन', 'मांग भरो सजना', 'दासी', 'अंगूर', 'घर एक मंदिर', 'जल्लाद' असे अनेक सिनेमे सुपरहिट झाले. मौसमी यांनी प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांच्या मुलासोबत जयंत यांच्यासोबत लग्न केलं आहे.
 

Web Title: bollywood moushumi chatterjee shot a rape scene in pregnancy period during roti kapda aur makaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.