Gangubai Kathiawadi: आलिया प्रेमात पाडणारा शांतनु माहेश्वरी आहे तरी कोण? जाणून घ्या, या अभिनेत्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 16:11 IST2022-02-20T16:10:39+5:302022-02-20T16:11:12+5:30

Shantanu maheshwari: 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातील 'जब सैय्याँ' या गाण्यात आलिया भट्टसोबत अभिनेता शांतनु माहेश्वरी झळकला आहे.

bollywood gangubai kathiawadi who is shantanu maheshwari romancing with alia bhatt in his debut film | Gangubai Kathiawadi: आलिया प्रेमात पाडणारा शांतनु माहेश्वरी आहे तरी कोण? जाणून घ्या, या अभिनेत्याविषयी

Gangubai Kathiawadi: आलिया प्रेमात पाडणारा शांतनु माहेश्वरी आहे तरी कोण? जाणून घ्या, या अभिनेत्याविषयी

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चांमध्येच चित्रपटातील जब सैय्याँ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्यात गंगुबाई म्हणजेच आलिया एका मुलासोबत नजरेने बोलतांना दिसत आहे. त्यामुळे चित्रपटात तिला प्रेमात पाडणारा हा तरुण नेमका आहे तरी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे हे गाणं रिलीज झाल्यापासून नेटकऱ्यांनी या अभिनेत्याविषयी अनेक गोष्टी सर्चही केल्या आहेत. 

कोण आहे शांतनु माहेश्वरी?

'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातील 'जब सैय्याँ' या गाण्यात आलिया भट्टसोबत अभिनेता शांतनु माहेश्वरी झळकला आहे. विशेष म्हणजे शांतनु छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. शांतनु अभिनेता असण्यासोबतच एक डान्सर आणि नृत्यदिग्दर्शक आहे. शांतनुने अनेक गाजलेल्या मालिका, रिअॅलिटी शोमध्ये काम केलं असून गंगुबाई काठियावाडीच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

खतरों के खिलाडी विजेता आहे शांतनु

शांतनुने खतरों के खिलाडी सीजन ८ मध्ये सहभाग घेतला होता. केवळ सहभागचं नाही तर त्याने हे पर्व जिंकलंदेखील. तसंच तो एमटीव्हीच्या गर्ल्स ऑन टॉप, नच बलिए सीजन ९ मध्येही झळकला आहे.
 

Web Title: bollywood gangubai kathiawadi who is shantanu maheshwari romancing with alia bhatt in his debut film