सख्ख्या मोठ्या बहिणीच्या मुलीशी केलं लग्न, पहिलं लग्न मोडल्यानंतर भाचीसोबत दिग्दर्शकाने थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:43 IST2026-01-22T13:42:12+5:302026-01-22T13:43:01+5:30

पहिलं लग्न मोडल्यानंतर बॉलिवूडमधल्या या प्रसिद्ध दिग्दर्शकाने स्वत: च्या भाचीशीच लग्न करत संसार थाटला होता. त्यामुळे त्याच्यावर टीकाही करण्यात आली होती. याशिवाय दिग्दर्शकाच्या घरातील कोणालाच हा निर्णय पटला नव्हता. 

bollywood famous director vijay anand married to his niece sushma kohli | सख्ख्या मोठ्या बहिणीच्या मुलीशी केलं लग्न, पहिलं लग्न मोडल्यानंतर भाचीसोबत दिग्दर्शकाने थाटला संसार

सख्ख्या मोठ्या बहिणीच्या मुलीशी केलं लग्न, पहिलं लग्न मोडल्यानंतर भाचीसोबत दिग्दर्शकाने थाटला संसार

बॉलिवूडमधीलसेलिब्रिटी आणि त्यांचं लाइफ हा कायमच चर्चेचा विषय असतो. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींचे अफेअर तर जगप्रसिद्ध आहेत. बॉलिवूडमध्ये एका मामा-भाचीची लव्हस्टोरीही प्रचंड गाजली होती. पहिलं लग्न मोडल्यानंतर बॉलिवूडमधल्या या प्रसिद्ध दिग्दर्शकाने स्वत: च्या भाचीशीच लग्न करत संसार थाटला होता. त्यामुळे त्याच्यावर टीकाही करण्यात आली होती. याशिवाय दिग्दर्शकाच्या घरातील कोणालाच हा निर्णय पटला नव्हता. 

देव आनंद हे बॉलिवूडमधील मोठं नाव. देव आनंद यांचे भाऊ विजय आनंद हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांचं अख्खं कुटुंबच बॉलिवूडमध्ये होतं. मोठा भाऊ चेतन आनंद निर्माता तर देव आनंद सुपरस्टार अभिनेता. अवघ्या २३व्या वर्षी विजय आनंद यांनी नौ दो ग्यारह सारखा सुपरहिट सिनेमा दिग्दर्शित केला होता. बॉलिवूडमध्ये त्यांचं मोठं नाव होतं. पण, बॉलिवूड करिअरपेक्षा जास्त ते पर्सनल लाइफमुळे चर्चेत होते. त्यांनी लवलीन थडानी यांच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. पण फार काळ हे लग्न टिकलं नाही. घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यानंतर विजय आनंद यांनी १९७८ साली राम बलराम या सिनेमाचं शूटिंग सुरू असतानाच त्यांनी आपल्या भाचीशी दुसरं लग्न केलं. 

विजय आनंद यांनी सख्ख्या मोठ्या बहिणीची मुलगी सुषमा कोहलीशी लग्न करत संसार थाटला होता. भाचीसोबत लग्न केल्याने विजय आनंद यांचं कुटुंबीय खूश नव्हतं. देव आनंद यांनाही आपल्या भावाचा हा निर्णय पटला नव्हता. याशिवाय त्यांना बॉलिवूडमध्येही यावरुन ट्रोल केलं गेलं होतं. 

Web Title : निर्देशक विजय आनंद ने पहली शादी टूटने के बाद भतीजी से शादी की।

Web Summary : निर्देशक विजय आनंद का निजी जीवन विवादों में रहा। पहली शादी टूटने के बाद, उन्होंने अपनी भतीजी, अपनी बड़ी बहन की बेटी से शादी कर ली। उनके भाई देव आनंद सहित उनके परिवार ने इस फैसले को अस्वीकार कर दिया, और उन्हें सार्वजनिक आलोचना का सामना करना पड़ा।

Web Title : Director Vijay Anand married his niece after first marriage failed.

Web Summary : Director Vijay Anand's personal life sparked controversy. After his first marriage ended, he married his niece, the daughter of his elder sister. This decision was disapproved by his family, including his brother Dev Anand, and faced public criticism.