दोन मुलांचं संगोपन करताना करण जोहरला सतावते 'या' गोष्टीची चिंता; म्हणतो-"मी त्यांना काय उत्तर देणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 12:39 IST2024-11-04T12:32:17+5:302024-11-04T12:39:02+5:30

बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहर सध्या चर्चेत आला आहे. नुकतंच करणने त्याच्या जुळ्या मुलांबद्दल एक वक्तव्य केलं आहे. 

bollywood director karan johar says in interview he lives in constant fear of his kids will about single parenthood  | दोन मुलांचं संगोपन करताना करण जोहरला सतावते 'या' गोष्टीची चिंता; म्हणतो-"मी त्यांना काय उत्तर देणार"

दोन मुलांचं संगोपन करताना करण जोहरला सतावते 'या' गोष्टीची चिंता; म्हणतो-"मी त्यांना काय उत्तर देणार"

Karan Johar : फिल्मी जगतात कायमच लाईमलाइटमध्ये असणारा दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. करण जोहरबद्दल सिनेविश्वात कधी त्याच्या धर्मा प्रोडक्शनमुळे तर कधी त्याच्या चित्रपटांमुळे चर्चा होताना दिसते.  पण, सध्या करणने त्याच्या जुळ्या मुलांबद्दल एका मुलाखतीत केलेलं वक्तव्याने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. या मुलाखतीत त्याने मुलगा यश आणि त्याची मुलगी रुही यांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

नुकतीच करण जोहरने "Fabulous Lives of Bollywood Wives " या शोमध्ये हजेरी लावली. त्यामध्ये सिंगल पालक म्हणून करणला मुलांचं संगोपन करताना कोणत्या गोष्टीचं टेन्शन येतं? याबाबत खुलासा केला आहे. या मुलाखतीत करण जोहर म्हणाला, " मला कधी-कधी मुलांना एकट्याने वाढवताना एका गोष्टीची चिंता सतावते. उद्या माझी मुलं मोठी होतील तेव्हा सिंगल पालक म्हणून ते असंख्य प्रश्न मला विचारतील. तेव्हा मी त्यांना काय उत्तर देणार? मला माहिती आहे त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे". करण जोहरच्या या वक्तव्यानुसार मुलं मोठी झाल्यावर आईबद्दल प्रश्न विचारतील का ? त्याला या गोष्टीची चिंता सतावते आहे.

करण जोहर अविवाहित असून सरोगसीद्वारे तो दोन मुलांचा बाबा आहे. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. करण व त्याची आई हिरू जोहर दोघेही या मुलांचा सांभाळ करतात.

Web Title: bollywood director karan johar says in interview he lives in constant fear of his kids will about single parenthood