अजय देवगणसोबत बॉलिवूड डेब्यू, अनेक चित्रपटांत खलनायकाची भूमिका, आता बनले मौलाना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 15:18 IST2025-01-19T15:18:02+5:302025-01-19T15:18:58+5:30

90 च्या दशकातील अनेक हिट चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा आरिफ खान आता धर्मप्रचारक बनला आहे.

Bollywood debut with Ajay Devgan, villain role in many films, now Arif Khan become Maulana | अजय देवगणसोबत बॉलिवूड डेब्यू, अनेक चित्रपटांत खलनायकाची भूमिका, आता बनले मौलाना...

अजय देवगणसोबत बॉलिवूड डेब्यू, अनेक चित्रपटांत खलनायकाची भूमिका, आता बनले मौलाना...

Actor Left Bollywood For Islam:बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी इस्लाम धर्मासाठी बॉलिवूडला अलविदा म्हटले आहे. या यादीत झायरा वसीम, सना खान...अशा लोकप्रिय नावांचाही समावेश आहे. पण, धर्मासाठी शोबिज सोडणाऱ्या कलाकारांच्या यादीत फक्त अभिनेत्रींसोच नाही, तर एका अभिनेत्याचाही समावेश आहे. अजय देवगणच्या 'फूल और कांटे' या डेब्यू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता आरिफ खान आता मौलाना झाला आहे.

अजय देवगणप्रमाणेच आरिफनेही 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फूल और कांटे' चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत प्रवेश केला. 'फूल और कांटे'मध्ये खलनायक रॉकीची भूमिका खूप लोकप्रिय ठरली.


या चित्रपटांमध्येही केले काम 
'फूल और कांटे' नंतर आरिफ खानने 90 च्या दशकातील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. आरिफ खानने सुनील शेट्टी, सलमान खान आणि अक्षय कुमारसारख्या सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली. त्याने 'मोहरा', 'वीरगती' आणि 'दिलजले' सारख्या सुपरहिट चित्रपटात खलनायक/सहकलाकाराची भूमिका निभावली. बॉलिवूडनंतर त्याने 2007 मध्ये हॉलिवूड चित्रपट 'अ माईटी हार्ट'मध्येही काम केले. या चित्रपटात त्याने टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अँजेलिना जोली प्रमुख भूमिकेत होती.

धर्मासाठी शोबिज सोडले
अनेक वर्षे काम करुनही आरिफ खानला मोठा रोल मिळाला नाही. हळुहळू त्याची लोकप्रियता कमी झाली अन् बॉलिवूडलाही त्याचा विसर पडला. यानंतर त्याने शोबिझला अलविदा केले अन् इस्लाम धर्मासाठी काम सुरू केले. आता त्याचा लूक खूप बदलला आहे. लांब दाढी, कुर्ता-पायजमा, टोपी आणि चष्मा घालून तो धार्मिक संदेश देताना दिसतो. आरिफ खान स्वतःची टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीदेखील चालवतो. सध्या तो बंगळुरुमध्ये साधे जीवन जगत आहेत.

 

Web Title: Bollywood debut with Ajay Devgan, villain role in many films, now Arif Khan become Maulana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.