Ram Setu Teaser: अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’चा टीझर अन् पब्लिकच्या कमेंट्स! अक्कीची अशी घेतली मजा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 15:26 IST2022-09-26T15:25:53+5:302022-09-26T15:26:55+5:30

Ram Setu Teaser: ‘राम सेतू’ हा अक्षयचा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. त्याआधी ‘राम सेतू’चा टीझर रिलीज झाला आहे...

BOLLYWOOD akshay kumar ram setu teaser out twitter reaction | Ram Setu Teaser: अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’चा टीझर अन् पब्लिकच्या कमेंट्स! अक्कीची अशी घेतली मजा!!

Ram Setu Teaser: अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’चा टीझर अन् पब्लिकच्या कमेंट्स! अक्कीची अशी घेतली मजा!!

Ram Setu Teaser:  एकापाठोपाठ एक अशा फ्लॉप सिनेमानंतर अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आणखी एक सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. होय, ‘राम सेतू’ (Ram Setu ) हा अक्षयचा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. त्याआधी ‘राम सेतू’चा टीझर रिलीज झाला आहे. ‘राम सेतू’ या सिनेमाची घोषणा झाली, पोस्टर आलं तेव्हा या सिनेमात अयोध्या, राम मंदिर, राम सेतूचा उल्लेख असेल असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण टीझर पाहून लोक हैराण झालेत. कारण हा चित्रपट एक अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर मुव्ही आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर साहजिकच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

56 सेकंदाच्या या टीझरमध्ये समुद्राच्या वर हेलिकॉप्टर उडताना दिसतेय. बॅकग्राऊंडमध्ये अक्षय कुमारचा आवाज आहे. रामसेतू को बचाने के लिए हमारे पास सिर्फ 3 दिन हैं, असं तो म्हणतो. यानंतर अभिनेता नस्सची झलक दिसते. समुद्रात एकमेकांचा पाठलाग करणारी जहाजं, रेताळ जमिनीवरून सूसाट धावणाºया गाड्या, रोबोटची झलक आणि खूप सारा धमाका असा हा टीझर आहे.  

पब्लिक रिअ‍ॅक्शन
‘राम सेतू’चा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर  #RamSetu, #AkshayKumar आणि   #JacquelineFernandez ट्रेंड होत आहे. ट्विटरवर एक ना अनेक रिअ‍ॅक्शन पाहायला मिळत आहेत. काही लोकांना ‘राम सेतू’चा टीझर भलताच आवडला आहे. पण अनेकांनी यातील व्हिएफएक्सवर टीका केली आहे.

काहींनी सस्ता व्हीएफएक्स म्हणत, चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. काही युजर्सनी हा चित्रपट यावर्षातला सर्वात मोठा डिजास्टर ठरणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे.

अक्षय कुमारने एखाद्या गोष्टीला स्पर्श करताच त्याची चिंधी होते आणि नंतर डिजास्टर, अशा कमेंट्ही पाहायला मिळत आहेत.

अनेकांनी मात्र टीझरचं कौतुक केलं आहे. या टीझनमध्ये अ‍ॅक्शन, ड्रामा, थ्रील, सस्पेन्स सगळं काही असल्याचं अक्षयच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.

‘राम सेतू’ या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरूचा याशिवाय सत्यदेव, नस्सर, प्रवेश राणा आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘राम सेतू’ हा अक्षयचा यावर्षातला पाचवा सिनेमा आहे. याआधीचे त्याचे तिन्ही सिनेमे बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज व रक्षाबंधन दणकून आपटले. यानंतर ओटीटीवर कठपुतली रिलीज झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमे देणारा अक्षय आता नव्या चित्रपटासह येतोय. आता त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालतो, ते बघूच.

Web Title: BOLLYWOOD akshay kumar ram setu teaser out twitter reaction