ग्लॅमरस क्वीन झीनत अमानचा मुलगा आहे त्यांच्यापेक्षाही स्टायलिस्ट; बॉलिवूडच्या अभिनेत्यांना देतो टक्कर, पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 15:09 IST2022-07-25T15:07:36+5:302022-07-25T15:09:27+5:30

बॉलिवूडच्या ग्लॅमरस क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झीनत अमान यांना ओळखत नसेल अशी कोणती व्यक्ती नसेल.

bollywood actress zeenat aman son zahaan khan is handsome dude now latest photos viral fans said carbon copy of mom | ग्लॅमरस क्वीन झीनत अमानचा मुलगा आहे त्यांच्यापेक्षाही स्टायलिस्ट; बॉलिवूडच्या अभिनेत्यांना देतो टक्कर, पाहा Photo

ग्लॅमरस क्वीन झीनत अमानचा मुलगा आहे त्यांच्यापेक्षाही स्टायलिस्ट; बॉलिवूडच्या अभिनेत्यांना देतो टक्कर, पाहा Photo

बॉलिवूडच्या ग्लॅमरस क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झीनत अमान यांना ओळखत नसेल अशी कोणती व्यक्ती नसेल. त्यांनी अनेक वर्ष बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा असोत किंवा धर्मेंद्र असोत, झीनत अमान यांनी प्रत्येक मोठ्या स्टारसोबत पडद्यावर भूमिका साकारल्या आहेत. मोठ्या पडद्यावरही त्या आपली छाप सोडण्यातही यशस्वी झाल्या. झीनत अमान यांनी १९८५ मध्ये मजहर खान यांच्याशी विवाह केला. त्यांना जहान आणि अजान खान नावाची दोन मुले आहेत. त्यांचा मुलगाही त्यांच्यापेक्षा स्टायलिस्ट आहे.

झीनत अमान यांचा मुलगा जहान खान हा संगीतकार आणि अभिनेता आहे. त्यानं कपिल शर्माच्या Dunno Y: Love is Love या चित्रपटातून संगीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. या चित्रपटात झरीना वहाब, मोना आंबेगावकर आणि किटू गिडवानी यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. सध्या व्हायरल होत असलेल्या जहान खानच्या फोटोंमध्ये तो सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये त्याने एकामागून एक अनेक फोटो टाकले आहेत. हे फोटो जुने असले तरी आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.


काही काळापूर्वी जहान खानने त्याच्या इन्स्टा हँडलवर आई झीनत अमान यांचा फोटो शेअर केला होता. त्यामध्ये त्या पाठमोऱ्या बसलेल्या दिसत होत्या. तो फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला होता.

Web Title: bollywood actress zeenat aman son zahaan khan is handsome dude now latest photos viral fans said carbon copy of mom