तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप; आता पुन्हा प्रेमात पडली अभिनेत्री? रुमर्ड बॉयफ्रेंडने खरं काय सांगितलंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 09:10 IST2025-10-29T09:07:52+5:302025-10-29T09:10:48+5:30
ब्रेकअपनंतर बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडली? अखेर सत्य समोर आलं

तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप; आता पुन्हा प्रेमात पडली अभिनेत्री? रुमर्ड बॉयफ्रेंडने खरं काय सांगितलंच
Bollywood Actress Zareen Khan:बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान हे नाव कोणासाठी नवीन नाही. सलमानच्या वीर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केलं.मात्र, गेली काही वर्षे अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दूरावली आहे. दमदार पदार्पणानंतर जरीनला फारशा संधी मिळाल्या नाहीत. सध्या जरीन खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.बिग बॉस फेम शिवाशिष मिश्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर जरीन खान पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरु झाल्या.
जरीन खान मॉडेल आणि अभिनेता रौहेद खानला डेट करत असल्याचं बोललं जातं होतं. अलिकडेच सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल झाले होते, दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये दिसून आले. त्यांचं नातं काही काळापूर्वीच सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे. जरीन आणि रौहेदला अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. दरम्यान, या अफवांचं खंडण करत यावर रौहेद खानने प्रतिक्रिया दिली आहे. फ्री प्रेस जर्नल सोब बोलताना रौहेद म्हणाला, आमच्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे. आणि आम्ही डिनरसाठी भेटलो होतो. ं याप्रकरणी जरीनने मात्र मौन बाळगलं आहे.
३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप...
दरम्यान, जरीन खान आणि शिवामिष यांनी २०२१ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर शिवाशिष मिश्रापासून ती वेगळी झाली. या नात्याबद्दल खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यादरम्यान ती म्हणाली, त्यांच्या ब्रेकअपला काही गोष्टी कारणीभूत ठरल्या. दोघेही वेगवेगळ्या वातावरणात मोठे झाले, त्यामुळे त्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला.