सर्वांची इच्छा पूर्ण होणार! 'धुरंधर २' मध्ये बॉलिवूडची 'ही' प्रसिद्धी अभिनेत्री झळकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:04 IST2026-02-04T10:03:06+5:302026-02-04T10:04:27+5:30
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, आता या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे.

सर्वांची इच्छा पूर्ण होणार! 'धुरंधर २' मध्ये बॉलिवूडची 'ही' प्रसिद्धी अभिनेत्री झळकणार?
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, आता या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दिसणार आहे. ही अभिनेत्री सिनेमात झळकणार असल्याने चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. कोण आहे ती? जाणून घ्या
'धुरंधर २' सिनेमात अभिनेत्री यामी गौतम एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामी गौतम 'धुरंधर २' मध्ये 'कॅमिओ' (छोटा पण महत्त्वाचा रोल) भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तिने ५ दिवसांचे शूटिंग शेड्यूल पूर्ण केल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचे पती आदित्य धर करत आहेत. पहिल्या भागात यामीची काम करण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती, जी आता या दुसऱ्या भागात पूर्ण होताना दिसत आहे. मात्र, अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
'धुरंधर २' हा एक मल्टी-स्टारर चित्रपट आहे. यात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत आहेत. तसेच, अक्षय खन्नाच्या 'रहमान डकैत' या पात्राची फ्लॅशबॅक स्टोरीही यात पाहायला मिळणार आहे. याशिवाय, अभिनेता विकी कौशल देखील या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
'धुरंधर'च्या पहिल्या भागाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ८९५ कोटींहून अधिक आणि जगभरात जवळपास १३५० कोटींची कमाई केली होती. आता आदित्य धर दिग्दर्शित हा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. अशातच यामीची वर्णी लागल्याने 'धुरंधर पार्ट २' नक्कीच हिट होईल, यात शंका नाही.