'अबीर गुलाल' वरील बंदीनंतर अभिनेत्री वाणी कपूरने उचललं 'हे' मोठं पाऊल; जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 14:36 IST2025-05-03T14:34:02+5:302025-05-03T14:36:55+5:30
'अबीर गुलाल' वरील बंदीनंतर अभिनेत्री वाणी कपूरने घेतला मोठा निर्णय, असं काय केलं?

'अबीर गुलाल' वरील बंदीनंतर अभिनेत्री वाणी कपूरने उचललं 'हे' मोठं पाऊल; जाणून घ्या याबद्दल
Vaani Kapoor: जम्मू काश्मीरमध्ये येथील पहलगामध्ये झालेल्या दशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर भारत सरकार अॅक्शन मोडवर आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर एकानंतर एक कारवाई करायला सुरुवात केली. त्यानंतर भारताने पाकवर डिजिटल स्ट्राईकही केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या कलाकृतींवरही बंदी घालण्यात आली. अलिकडेच भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि फवाद खानची मुख्य भूमिका होती. अशातच या चित्रपटावरील बंदीनंतर अभिनेत्री वाणी कपूरने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतरअनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या घटनेचा निषेध नोंदवला. त्याच्यानंतर आता काही पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंटही भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. अशातच अभिनेत्री वाणी कपूरने 'अबीर गुलाल' चित्रपटावरील बंदीनंतर मोठं पाऊल उचललं आहे. चित्रपटाला बॅन करण्यात आल्यानंतर वाणी कपूरने सोशल मीडियावरुन 'अबीर गुलाल' संदर्भातील फोटो आणि व्हिडीओ हटवले आहेत. सर्व पोस्ट तिने डिलीट केल्या आहेत. तिच्या या निर्णयाने सगळ्याचं लक्ष वेधलंय.
दरम्यान, 'अबीर गुलाल' सिनेमा येत्या ९मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार होता. या सिनेमात फवाद खान आणि वाणी कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. तर लीजा हेडन, सोनी राजदान, रिद्धी डोगरा, फरीदा जलाल, परमीत सौठी अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे. या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये झालं होतं. आरती एस बागरी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
वाणी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर ती नुकताच प्रदर्शित झालेल्या रेड-२ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे.