"बहीण डिप्रेशनमध्ये गेली अन्...", तृप्ती डिमरीने सांगितला 'अॅनिमल' मध्ये काम केल्यानंतरचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:28 IST2025-07-25T13:23:43+5:302025-07-25T13:28:07+5:30
संदीप रेड्डी लांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' या चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

"बहीण डिप्रेशनमध्ये गेली अन्...", तृप्ती डिमरीने सांगितला 'अॅनिमल' मध्ये काम केल्यानंतरचा अनुभव
Tripti Dimri:तृप्ती डिमरी (Tripti Dimri) ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय असणारी अभिनेत्री आहे. २०१८ मध्ये आलेल्या 'लैला मजनू' चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. परंतु, 'अॅनिमल' या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. संदीप रेड्डी लांगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती, पण, तितकीच त्यावर टीकाही झाली. तृप्ती डिमरीने 'अॅनिमल' मध्ये रणबीर सिंग इंटीमेट सीन दिल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी तिच्या बहिणीने मदत केल्याचे तृप्तीने सांगितलं. एका मुलााखती अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला.
अलिकडेच तृप्तीने 'टू फिल्मी'सोबत संवाद साधला त्यादरम्यान, अॅनिमल मधील त्या सीननंतर तिला टीकेला सामोरं जावं लागलंच शिवाय त्याचा परिणाम आपल्या कुटुंबीयांवर देखील झाला असं तिने म्हटलं. त्यावेळी तृप्ती म्हणाली, "इतक्या ट्रोलिंगनंतर मी सोशल मीडियावरील कमेंट्स वाचणं बंद केलं.पण, माझी बहीण रात्रभर जागून त्या सगळ्या कमेंट्स वाचायची. त्यामुळे तिला खूप डिप्रेशन आलं होतं. शिवाय या सगळ्याचा परिणाम माझ्यावर होईल असं तिला वाटत होतं. "
यानंतर तृप्ती म्हणाली, त्यावेळी तिने मला एक सल्ला दिला, तुम्ही चांगलं काम केलं तरी लोक बोलतच राहतील. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी मनापासून कराव्या वाटतात त्या करा. हे तुझं आयुष्य आहे आणि ते आपल्याला फक्त एकदाच जगायला मिळतं. तुम्ही चुका कराल, पण त्यातून तुम्ही शिकाल. असं तिने मला सांगितलं होतं.
बहिणीने कायम पाठिंबा दिला...
मग अभिनेत्री म्हणाली," या प्रवासात माझ्या बहिणीने कायम पाठिंबा दिला आहे. जेव्हा मी ऑडिशनमध्ये फेल झाले तर पहिले तिला फोन करायचे आणि रडायचे, तेव्हापासून ती माझ्यासोबत राहिली आहे. तुला खूप मेहनत करायची आहे, कोण काहीही बोलेल त्यावर लक्ष देऊ नको, असा धीर ती मला द्यायची."
सध्या तृप्ती डिमरी 'धडक-२' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती सिध्दांत चतुर्वेदीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. येत्या १ ऑगस्टला हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.