पाकिस्तानातील सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने बॉलिवूडमध्ये कमावलं स्वतःचं नाव, कोण आहे ही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 14:47 IST2024-07-25T14:47:14+5:302024-07-25T14:47:47+5:30

बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रीचे बाबा पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेते होते

bollywood actress tabu father jamal hashmi was popular actor in pakistan | पाकिस्तानातील सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने बॉलिवूडमध्ये कमावलं स्वतःचं नाव, कोण आहे ही?

पाकिस्तानातील सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने बॉलिवूडमध्ये कमावलं स्वतःचं नाव, कोण आहे ही?

पाकिस्तान देशातही कलासंस्कृती दिसून येते. पाकिस्तामधील अनेक कलाकारांना भारतातही चांगली प्रसिद्धी मिळवली. राहत फतेह अली खान, अतीफ अस्लम, फवाद खान अशा अनेक गायक - कलाकारांना भारतीय लोकांनी खूप प्रेम दिलं. पाकिस्तानात असाच लोकप्रिय अभिनेता होऊन गेला. या अभिनेत्याची लेक आज भारतात नाव कमावत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचं नाव आहे तब्बू. हो तुम्ही बरोबर वाचताय. तब्बूचे वडील पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेते होते. 

तब्बूचे बाबा होते पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेते

तब्बूच्या बाबा पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेते होते. त्याचं नाव जमाल अली हाशमी. जमाल १९७० सालापासून पाकिस्तानमधील मनोरंजन विश्वात सक्रीय होते. निर्माते अली अफ्फान सिद्दीकी यांनी जमाल यांना 'सिजा' या सिनेमासाठी कास्ट केले होते. या सिनेमात अभिनय करुन जमाल लोकप्रिय अभिनेता झाले. जमाल यांनी हैद्राबादमध्ये राहणारी शिक्षिका रिजवानासोबत लग्न केलं. रिजवाना ही अभिनेत्री शबाना आजमी यांची नातेवाईक होती. पुढे जमाल रिजवानाशी लग्न करुन तिला लाहोरमध्ये घेऊन आले. पण लाहोरमध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानातील फिल्मी दुनिया सोडून जमाल पत्नीसह भारतात आले.

जमाल यांची मुलगी तब्बू

भारतात परत आल्यानंतर जमाल आणि रिझवाना यांना तब्बू आणि फराह ही दोन मुलं झाली. परंतु काही महिन्यांनी जमाल यांनी रिझवानाला घटस्फोट दिला. पुढे  रिझवानाने दोन्ही मुलांचा एकट्याने सांभाळ केला. "मला त्यांच्याबद्दल कोणतंही कुतूहल नाही. माझं संगोपन जसं झालंय त्यात मी खूश आहे", अशी प्रतिक्रिया तब्बूने तिच्या वडिलांबद्दल दिली होती. अशाप्रकारे तब्बूचे वडील पाकिस्तानातील लोकप्रिय अभिनेते होते याची माहिती सर्वांना झाली.

Web Title: bollywood actress tabu father jamal hashmi was popular actor in pakistan