"बघ, तो तुला सोडून जाईल...", बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नात आईनेच आणलेली आडकाठी, स्वत:चं सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 10:34 IST2026-03-29T10:16:03+5:302026-03-29T10:34:08+5:30

"तो तुला सोडून जाईल...", बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाला आईनेच केला होता तीव्र विरोध, ३८ वर्षांपूर्वी दिलेली सक्त ताकीद

bollywood actress supriya pathak mother dina pathak warned her to marrying with pankaj kapur know the reason | "बघ, तो तुला सोडून जाईल...", बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नात आईनेच आणलेली आडकाठी, स्वत:चं सांगितला किस्सा

"बघ, तो तुला सोडून जाईल...", बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नात आईनेच आणलेली आडकाठी, स्वत:चं सांगितला किस्सा

Supriya Pathak: आपल्या चित्रसृष्टीत केवळ मोठ्या पडद्यावरच नाही तर छोट्या पडद्यावर अप्रतिम भूमिका साकारून लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक गुणवान अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठक. अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग असलेल्या सुप्रिया पाठक या त्यांच्या फिल्मी करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत राहिल्या. अवघ्या २२ व्या वर्षात पहिलं लग्न मोडलं. त्यानंतर त्यांनी अभिनेते पंकज कपूर यांच्याशी लग्न केलं.गेली ३८ वर्ष ते नेटाने संसार करत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया यांनी खुलासा केला की, सुरुवातीला त्यांच्या आईचा नात्याला तीव्र विरोध होता. 

अगला मौसम चित्रपटाच्या सेटवर झालेली पहिली भेट ते त्यानंतर हे नातं लग्नापर्यंत पोहोचलं.पण, कोणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी प्रेम निवडलं आणि लग्नाचा निर्णय घेतला. अलिकडेच  आरा सना कपूरसोबतच्या संभाषणात सुप्रिया म्हणाल्या, "माझ्या आईला तो आवडत नव्हता. तिला वाटायचं की हे नातं टिकणार नाही. आमच्या लग्नाला ३८ वर्षे झाली आहेत. माझी आई मला म्हणालेली, 'बघ, तो एक दिवस तुला सोडून जाईल."

त्यानंतर सुप्रिया पाठक म्हणाल्या, माझ्या आईला असं का वाटत होतं हे मला आजपर्यंत कळालं नाही. मग सुप्रिया यांनी सांगितलं की, त्यांच्या आईनं लग्न होऊ नये यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यांनी पंकजवर पाळत ठेवायला लावली आणि तो खूप दारू पितो असं तिचं म्हणणं होतं.  पण, त्यांनी कधीच दारुला हात लावला नाही, हेच सत्य आहे. मात्र, माझी बहीण रत्ना पाठकने  माझ्या या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा दिला होता. " परंतु, काही काळानंतर आईला अखेरीस विश्वास बसू लागला की पंकज तिच्यासाठी योग्य व्यक्ती आहे. तो तिला खूप आवडू लागला आणि तो नेहमी तिच्यासोबत असावा असे तिला वाटू लागलं.

सुप्रिया पाठक यांनी वयाच्या २२ व्या वर्षी लग्न केले. मात्र,  हे लग्न फार काळ टिकलं नाही. १९८८ मध्ये त्यांनी पंकज कपूर यांच्याशी लग्न केले, ज्यांची पहिली पत्नी नीलिमा आझम होती. पंकज हे अभिनेता शाहिद कपूरचे वडील आहेत. १९८४ मध्ये पंकज कपूर आणि निलिमा यांचा घटस्फोट झाला. पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांना रुहान कपूर आणि सना कपूर ही दोन मुले आहेत, जे आता विवाहित आहेत.

Web Title : सुप्रिया पाठक की माँ ने परित्याग के डर से शादी का विरोध किया; अभिनेत्री ने कहानी बताई।

Web Summary : सुप्रिया पाठक ने खुलासा किया कि उनकी मां ने शुरू में पंकज कपूर से उनकी शादी का विरोध किया था, क्योंकि उन्हें डर था कि वह उन्हें छोड़ देंगे। अपनी मां के शादी रोकने के प्रयासों के बावजूद, जिसमें पंकज की शराब पीने की आदतों पर संदेह करना भी शामिल था, सुप्रिया ने उनसे शादी कर ली। उनकी शादी को 38 साल हो चुके हैं।

Web Title : Supriya Pathak's mother opposed marriage, fearing abandonment; actress reveals story.

Web Summary : Supriya Pathak revealed her mother initially opposed her marriage to Pankaj Kapur, fearing he would leave her. Despite her mother's attempts to stop the wedding, including suspecting Pankaj's drinking habits, Supriya married him. They've been married for 38 years.