"रात्रभर झोप येत नाही, सतत विचार...", मुलीच्या जन्मानंतर डिप्रेशनचा सामना करतेय 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:10 IST2024-12-20T14:05:00+5:302024-12-20T14:10:00+5:30

'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेहगलच्या (Sonnali Seygall) घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

bollywood actress sonnalli seygall reaction on postpartum depression says unable to sleep in the nights | "रात्रभर झोप येत नाही, सतत विचार...", मुलीच्या जन्मानंतर डिप्रेशनचा सामना करतेय 'ही' अभिनेत्री

"रात्रभर झोप येत नाही, सतत विचार...", मुलीच्या जन्मानंतर डिप्रेशनचा सामना करतेय 'ही' अभिनेत्री

Sonnali Seygall: 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेहगलच्या (Sonnali Seygall) घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सोनालीने तिच्या मुलीचं नाव शुकर असं ठेवलं आहे. वर्षभरापूर्वी सोनालीने बॉयफ्रेंड आशीष सजनानीशी लग्न केलं. आता तिने गूड न्यूज दिली आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर अभिनेत्री सोनाली आणि तिचा पती आशिष दोघेही आनंदात आहेत.  सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली होती. सोनाली सध्या तिचं मातृत्व सुख अनुभवत आहे. मुलीच्या जन्मानंतर तिच्या आयुष्यात फारच बदल झाला आहे. यामुळे सोनालीला नैराश्याचा सामना करावा लागत असल्याचा खुलासा तिने केला आहे.

नुकतंच सोनाली सेहगलेने लेकीच्या जन्मानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलांविषयी भाष्य केलं आहे. एका मुलाखमध्ये अभिनेत्री म्हणाली, "मी रात्रभर झोपत नाही. जर माझं बाळ गाढ झोपेत असलं तरीही मी अस्वस्थ असते. कारण प्रत्येक २ तासानंतर मला त्याला दूध पाजावं लागतं. हे सगळं मॅनेज करताना कुठून शक्ती येते देवजाणे!"

पुढे अभिनेत्री म्हणाली, "मला वाटतं गर्भवती असताना शेवटच्या महिन्यापर्यंत आपण या सगळ्या गोष्टींसाठी तयार होतो. तर आठव्या आणि नवव्या महिन्यात त्रास थोडा आणखी वाढतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस तुम्हाला सारखी जाग येत. वारंवार झोपेतून उठावं लागतं. सध्या मी फक्त २-३ तास झोपते. माझ्याकडे ना कोणती बाई देखील नाही की ज्यामुळे मी माझ्या मुलीची सगळी काम तिच्यावर सोपवू शकेन, किंवा थोडा आराम करू शकेन. मातृत्वसुख अनुभवताना तुम्ही स्वत: कडे लक्ष द्यायचं विसरून जाता. तेव्हा सर्वात आधी तुमच्या डोक्यात मुलांचा विचार येत असतो."

"सध्या मी पोस्टपार्टम डिप्रेशनचा सामना करते आहे. परंतु हे सगळं मी मॅनेज करतेय. स्वत:साठी जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ मी काढते. पण, माझ्या मुलीला मी पहिलं प्राधान्य देते. असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

Web Title: bollywood actress sonnalli seygall reaction on postpartum depression says unable to sleep in the nights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.