Video: प्रेग्नंट सोनम कपूरने इव्हेंटला लावली हजेरी, काळ्या साडीत फ्लॉन्ट केला बेबी बंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 10:51 IST2025-12-06T10:50:51+5:302025-12-06T10:51:17+5:30
गरोदर सोनमने नुकतंच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या इव्हेंटमधील सोनमचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत.

Video: प्रेग्नंट सोनम कपूरने इव्हेंटला लावली हजेरी, काळ्या साडीत फ्लॉन्ट केला बेबी बंप
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोनमने प्रेग्नंट असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. सोनमने सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो पोस्ट केला होता. आता गरोदर सोनमने नुकतंच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या इव्हेंटमधील सोनमचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत.
सोनमने स्वदेश या ब्रँडच्या इव्हेंटसाठी हजेरी लावली होती. या इव्हेंटसाठी तिने खास लूक केला होता. काळ्या रंगाची साडी आणि डिझायनर ब्लाऊज असा लूक सोनमने केला होता. केसांचा बन बांधत साजेसा मेकअप तिने केला होता. या इव्हेंटमधील सोनमचे व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये ती पापाराझींसमोर पोझ देताना दिसत आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन सोनमचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसत आहे. सोनमच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, सोनमने बिजनेसमॅन आनंद अहुजाशी २०१८ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर ३ वर्षांनी तिने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. सोनमने लेकाचं नाव वायू असं ठेवलं आहे. आता दुसऱ्यांदा ती गरोदर आहे. सोनम आणि आनंद त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. आता यावेळी सोनमला पुत्ररत्न की कन्यारत्नाची प्राप्ती होणार, हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.