"सिराजलाच जाऊन विचारा..."; अभिनेत्री श्रद्धा कपूर भडकली? नाराजीचं नक्की कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 14:29 IST2023-09-18T14:27:56+5:302023-09-18T14:29:34+5:30

भारताच्या विजयात सिराजचा सिंहाचा वाटा होता.

Bollywood Actress Shraddha Kapoor says we should ask Mohammed Siraj what to do in free time IND vs SL Asia Cup Final  | "सिराजलाच जाऊन विचारा..."; अभिनेत्री श्रद्धा कपूर भडकली? नाराजीचं नक्की कारण काय?

"सिराजलाच जाऊन विचारा..."; अभिनेत्री श्रद्धा कपूर भडकली? नाराजीचं नक्की कारण काय?

Shraddha Kapoor Siraj, IND vs SL Asia Cup Final : भारतीय संघाने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेला नेस्तनाबूत केले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम गोलंदाजी करण्याची संधी दिली. मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या फलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करून सोडले. त्याने २१ धावांच्या मोबदल्यात ६ बळी टिपले. हार्दिक पांड्याचे ३ बळी आणि जसप्रीत बुमराहचा एक बळी याने त्याला चांगली साथ मिळाली. त्यानंतर भारतीय सलामीवीरांनी ६ षटकांत सामना संपवला. या विजयानंतर लोकांनी सिराजचे कौतुक केले असले तरी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने केलेल्या कमेंटमुळे ती काहीशी नाराज असल्याचे दिसले. तिच्या नाराजीचे नक्की कारण काय याबद्दल जाणून घेऊया.

नक्की प्रकरण काय?

क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्यातील नातं साऱ्यांनाच माहिती आहे. क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्या अफेअरच्या चर्चा तर चाहते अगदी चवीने वाचत असतात. तुम्हाला सिराज आणि श्रद्धा कपूर यांचे नाव वाचून असंच काहीसं वाटलं असेल तर.... जरा थांबा. तुम्ही जो विचार करताय तसा कोणताही संबंध नाही. याचा संबंध थेट फायनल मॅचशी आहे. आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी रंगली. रविवार हा सुट्टीचा वार असल्याने सारेच लोक सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आपापली घरची कामं आटोपून छान टीव्हीसमोर बसले. काहींनी तर रविवार संध्याकाळ मित्र-मैत्रिणींसोबत एकत्र मॅच बघत घालवण्याचेही प्लॅन्स केले होते. पण सिराजच्या तुफानापुढे श्रीलंका उद्ध्वस्त झाली. ५० षटकांचा सामना अंदाजे रात्री ९-१० वाजेपर्यंत चालला असता. त्यामुळे श्रद्धा कपूरनेही काही प्लॅन्स केले होते. पण सिराजच्या वादळामुळे सामना संध्याकाळी ७ वाजताच सुमारास संपला. त्यामुळे आता मोकळ्या वेळेत काय करायचे असा प्रश्न श्रद्धाला पडला. तिने आपल्या इन्स्टा स्टोरीला एक फोटो पोस्ट करत लिहीले- "आता सिराजलाच जाऊन विचारा की मोकळ्या वेळेत आम्ही काय करायचं?"

श्रद्धाने ही पोस्ट मजेशीर पद्धतीने केली होती. श्रद्धा नाराज झाली होती, कारण तिला सामना रंगतदार होण्याची अपेक्षा होती, पण तसे घडले नाही. असे असले तरी तिने नंतर भारताचे अभिनंदन केले.

Web Title: Bollywood Actress Shraddha Kapoor says we should ask Mohammed Siraj what to do in free time IND vs SL Asia Cup Final