६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी अन् राज कुंद्राने सोडलं मौन, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:53 IST2025-12-18T11:50:46+5:302025-12-18T11:53:20+5:30
६० कोटींच्या फसवणूकीचा आरोप! शिल्पा शेट्टी अन् राज कुंद्राने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले-"चुकीची माहिती…"

६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी अन् राज कुंद्राने सोडलं मौन, नेमकं काय म्हणाले?
Shilpa Shetty And Raj Kundra:बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याआहेत.आता हे दोघे ६० कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूकीच्या प्रकरणामुळे पु्न्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. मात्र, या आरोपांमध्ये काही तथ्थ नाही, असं म्हणत राज आणि शिल्पाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रावर सुमारे ६० कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी केलं आहे.याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) ची वाढ करण्यात आली आहे.या घटनेमुळे प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे. आता राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
We categorically deny the baseless and motivated allegations being circulated. The issues sought to be raised are being given a criminal colour without any lawful basis. A Quashing Petition has already been filed before the Hon’ble High Court and is pending adjudication. Having…
— Raj Kundra (@onlyrajkundra) December 16, 2025
शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये म्हटलंय, "आमच्या विरोधात पसरवल्या जात असलेल्या निराधार अफवा आणि खोटे आरोप आम्ही स्पष्टपणे नाकारतो.जे काही मुद्दे उपस्थित केले जात आहे, त्यांना कोणताही कायदेशीर आधार नाही.या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे.या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य केले आहे आणि आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे." असं शिल्पाने म्हटलं आहे. त्याचबरोबर माध्यमांनाही या प्रकरणाबद्दल कोणती चुकीची माहिती पसरवू नये, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील बिझनेसमॅन, कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०१५ ते २०२३ दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी त्यांना त्यांच्या कंपनी ‘बेस्ट डील टीव्ही प्रा. लि.’ मध्ये ६० कोटी रुपये गुंतवण्यास प्रवृत्त केले, परंतु त्यांनी हा निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरला.