"सेकंड फोटो बी लाईक..." सिझलिंग फोटोशूटमुळे शहनाज गिल होतेय ट्रोल, कमेंट करत चाहते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 13:09 IST2024-05-10T13:02:36+5:302024-05-10T13:09:12+5:30
'बिग बॉस 13' या शोमुळे शहनाज गिल हे नाव घराघरात पोहचलं.

"सेकंड फोटो बी लाईक..." सिझलिंग फोटोशूटमुळे शहनाज गिल होतेय ट्रोल, कमेंट करत चाहते म्हणाले...
Shehnaaz Gill : 'बिग बॉस 13' या शोमुळे शहनाज गिल हे नाव घराघरात पोहचलं. या शोमुळे अल्पावधीत अभिनेत्री लोकप्रिय झाली. मस्तीखोर अंदाज तसेच लोभसवाणा चेहरा याच्या जोरावर शहनाज गिलने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. 'बिग बॉस 13' शोनंतर अभिनेत्रीच्या फॅनफॉलोइंगमध्येही जबरदस्त वाढ झाली. पण सध्या एका लेटेस्ट फोटोशूटमुळे शहनाज नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
सध्याच्या घडीला शहनाज गिल हे नाव बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणलं जातं. परंतु बऱ्याचदा अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकतंच तिनं केलेलं सिझलिंग फोटोशूट चर्चेत आलं आहे. आकाशी रंगाच्या डिझायनर शॉर्ट ड्रेसमुळे शहनाजला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
शहनाज गिलने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केलेत. कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय.
शहनाजच्या या पोस्टवर चाहत्यांनी निगेटिव्ह कमेंट केल्या आहेत. ''सेकंड फोटो बी लाईक... जल्द ही पॉटी कर लेती हूं, नहीं तो कोई देख लेगा, पॉटी करने का तरिका थोडा कॅज्यूल हैं'' अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.